Avinash Sabe Olympic 2024 Live : अविनाश साबळे पदकाच्या शर्यतीत कुठेच नाही दिसला, फायनलमध्ये ११वा आला

Paris Olympic 2024 - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बुधवारचा दिवस भारतासाठी काही खास राहिला नाही. त्यात मध्यरात्री मीराबाई चानू व अविनाश साबळे यांनीही निराश केले.
avinash sable
avinash sableesakal
Updated on

India at Olympic 2024 Avinash Sable- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बुधवारचा दिवस भारतासाठी काही खास राहिला नाही. ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आले आणि भारताचं हक्काचं पदक गेलं. त्यानंतर अंतिम पंघाल कुस्तीच्या पहिल्याच फेरीत बाद झाली. मिश्र टेबल टेनिस गटातही भारताच्या पदरी निराशा आली आणि वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूचे पदक थोडक्यात हुकलं. ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत फायनलमध्ये अविनाश साबळेने निराश केले. तो ८ मिनिटे १४.१८ सेकंदासह ११वा राहिला.

वीट भट्टी कामगार होते आई-वडील

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अविनाश खूप कष्टाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करत होता. त्याची शाळा घरापासून ६-७ किलोमीटर लांब असल्याने तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याला सवय लागली. त्याचे आई-वडिल वीट भट्टी कामगार होते आणि घरातील मोठा मुलगा असल्याने अविनाशला आई- वडिलांच्या कष्टाचे मोल माहित होते. त्यामुळेच त्यानेही कॉलेज सांभाळून १०० रुपये रोजंदारीवर काम केले होते. १२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला.

राष्ट्रीय विक्रम...

पटियाला येथील फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाशने सुवर्णपदकाची कमाई केली. अविनाशने ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमासह पदक मिळवले. त्याने ७ मिनिटे २०.२० सेकंदात नवा विक्रम नोंदवला. याआधी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला होता आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. जागतिक स्पर्धेच्या स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला होता.

मोरोक्कोच्या खेळाडूचा विक्रम

पुरुषांच्या ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत मोरोक्कोच्या एल बक्काली सौफियानने ८ मिनिटे ०६.०५ सेकंद ही सत्रातील सर्वोत्तम वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. टोकियोतही मोरोक्कोच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले होते आणि सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्ण जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. अमेरिकेच्या केनथ रुक्सने ८ मिनिटे ०६.४१ सेकंद या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह रौप्यपदक नावावर केले, तर केनियाचा एब्राहम किबिवोत ८ मिनिटे ०६.४१ सेकंदासह कांस्यपदक घेऊन गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.