Avinash Sable: अविनाश साबळे Diamond League मध्ये नाही चमकला; २०२२ नंतर प्रथमच एवढा 'संथ' धावला

Avinash Sable Silesia Diamond League : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अविनाश साबळे ८ मिनिटे १४.१८ सेकंदासह ११वा राहिला होता.
Avinash Sable Silesia Diamond League
Avinash Sable Silesia Diamond League esakal
Updated on

Avinash Sable 3000m Steeplechase Men: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारताचा धावपटू अविनाश साबळे रविवारी Silesia Diamond League मध्ये शर्यतीत उतरला. ऑलिम्पिक स्पर्धेत ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तो ८ मिनिटे १४.१८ सेकंदासह ११वा राहिला होता. पण, आज त्याने यापेक्षा अधिक वेळ घेतला. २०२२ च्या जागतिक मैदानी स्पर्धेच्या फायनलनंतर प्रथमच अविनाश एवढा संथ पळाला..

आशियाई स्पर्धा विजेता; राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धा व आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अविनाशने दोन वेळा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. पटियाला येथील फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाशने सुवर्णपदकाची कमाई केली होती. अविनाशने ३ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यती ७ मिनिटे २०.२० सेकंदात नवा विक्रम नोंदवला होता. जागतिक स्पर्धेच्या ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला होता.

अविनाशसमोर आव्हान..

आज अविनाशसमोर अमेरिकेचा मॅथ्यू विलकिन्सन, जर्मनीचे कार्ल बेबेंडॉर्फ व फ्रेरडरीक रुपेर्ट यांचे आव्हान होते. पहिल्या ४०० मीटरमध्ये अविनाश खूप मागे होता, त्याच्याकडून आघाडीचे प्रयत्न होताना दिसले, परंतु अन्य स्पर्धक तगडे होते. अविनाश ४०० मीटरनंतर १४व्या क्रमांकावर होता. १२०० मीटर अंतर पार झाल्यानंतरही अविनाशने त्याचे १४वे स्थान कायम राखले होते. इथोपियाचा सॅम्युएल फिरेवूने निर्विवाद आघाडी राखली होती.

फोटो फिनिश...

केनियाचा आमोस सेरेमे दुसऱ्या क्रमांकावर होता. पहिल्या पाचमध्ये केनियन व इथोपियन खेळाडूंचे वर्चस्व स्पष्ट दिसले. शेवटच्या टप्प्यात केनियाच्या सेरेम, मोरोक्कोचा बक्काली सौफिन यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. सेरेम व बक्काली यांच्यात फोटो फिनिश झाली आणि दोघांनी ८:०४.२९ सेकंदासह शर्यत पूर्ण केली. सॅम्युअल ८:०४.३४ सेकंदासह तिसरा राहिला. अविनाशला ८:२९.९६ सेकंदासह १४व्या स्थानावर समाधान मानावे लागले. २०२२ नंतर ही त्याची सर्वात संथ कामगिरी ठरली. आजच्या निराशाजनक कामगिरीमुळे तो डायमंड लीगच्या फायनलच्या शर्यतीतून बाद झाला आहे. त्याला आता फायनल खेळता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.