Vinesh Phogat Join Congress: ऑलिम्पिकमध्ये काय घडलं? काँग्रेसमध्ये प्रवेश करताच विनेशचा BJP वर निशाणा, व्हिडिओ आणणार

Vinesh Phogat Bajrang Punia Join Congress: पॅरिस ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी आज अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भारतासाठी सलग तीन ऑलिम्पिक खेळणारी एकमेव महिला कुस्तीपटू असलेल्या विनेशने भाजप सरकारवर टीका केली आहे.
Vinesh Phogat Bajrang Punia Join Congress
Vinesh Phogat Bajrang Punia Join Congressesakal
Updated on

Vinesh Phogat Bajrang Punia Join Congress: पॅरिस ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी आज अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कारवाईमागे भाजपाचा हात असल्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला गेला, त्यावर तिने तिचे मत व्यक्त केले.

ती म्हणाली,'' मी तुम्हा सर्वांचे आभार मानते.. बुरे टाईममे पता लगता है अपना कौन है... जेव्हा आम्हाला रस्तावर फरफटत नेलं जात होतं, त्यावेळी भाजपासोडून सारेच आमच्यासोबत उभे राहिले. आमच्या डोळ्यांतील अश्रू काँग्रेसने ओळखले. मी अशा पक्षात आहे, जो महिलांच्या हक्कासाठी नेहमी उभा राहिला आहे.''

''जंतरमंतरमधील आंदोलनानंतर BJP च्या आयटी सेलने माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्यांना वेळोवेळी आसमान दाखवले. जी लढाई आम्ही सुरू केली होती, ती कायम राहील. सत्तेत असणाऱ्यांविरोधात उभी राहिली तेव्हा काँग्रेस आमच्यासोबत होते,''असेही ती म्हणाली.

ऑलिम्पिक फायनलचा प्रश्न अन्...

''ऑलिम्पिक फायनलपूर्वी जे घडलं त्याबाबत मी नक्कीच सांगेन. हा माझ्यासाठी भावनिक विषय आहे. योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच मी या संदर्भातला संपूर्ण व्हिडीओ पोस्ट करेन,''असे विनेश म्हणाली. यामागे भाजपाचा हात असल्याची चर्चा होती, यावर विचारलेल्या प्रश्नावर विनेशने हे उत्तर दिले.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी झालेल्या वजनामध्ये विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त आढळलं होतं. त्यामुळे तिला अपात्र ठरवले गेले आणि याविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली गेली. पण, क्रीडा लवादाने विनेशच्या विरोधातील निर्णय कायम ठेवला.

बजरंग पुनियानेही भाजपावर टीका केली. ''खेळाडू, शेतकरी, महिला यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही उभं राहणार आहोत. देशानेही आमच्यासोबत यावं,'' असे बजरंग म्हणाला.

राष्ट्रकुल स्पर्धेतील तीन सुवर्णपदकं, आशियाई स्पर्धेतील सुवर्ण व कांस्यपदक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन कांस्य अशी अनेक पदकं जिंकणाऱ्या विनेशने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात जंतरमंतरवर आंदोलन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.