PT Usha : भारतीय खेळाडूंना मदत करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न

पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करावी, यासाठी त्यांच्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षक, फिजिओथेरेपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे.
PT Usha
PT Ushasakal
Updated on

नवी दिल्ली - पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करावी, यासाठी त्यांच्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षक, फिजिओथेरेपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे. १३ जणांची स्पोर्ट्‌स सायन्सची टीमही सज्ज आहे. डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम कार्यरत राहणार आहे.

भारतीय खेळाडूंना मदत करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला जात आहे. टीकाकार या बाबींकडे डोळेझाकपणा करीत आहेत, अशा शब्दांत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

पी. टी. उषा पुढे म्हणाल्या, आयओएकडून क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आले आहे. खेळाडूंना मध्यभागी ठेवून विचार करण्यात येत आहे. आमच्या योजना व तयारी ही खेळाडूंना अग्रस्थानी ठेवूनच केली जात आहे. याआधी खेळाडू व सहायक स्टाफ यांच्यामध्ये थोडी दरी असायची. आता खेळाडूंसोबतच स्टाफचीही तेवढ्याच प्रमाणात निवड केली जात आहे.

पॅरिस ऑलिंपिकसाठी ११७ भारतीय खेळाडूंची निवड केली असून त्यांना ६८ प्रशिक्षक व ५० सहायक स्टाफचे मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे. पी. टी. उषा पुढे सांगतात की, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय क्रीडा संघटना, कॉर्पोरेट पार्टनर व आयओए मिळून भारतीय खेळाडूंना उत्तम सोयी-सुविधा पुरवत आहोत. तरीही काही व्यक्तींकडून विनाकारण टीका करण्यात येत आहे. त्यांना आम्ही केलेले काम दिसत नाही.

ॲड हॉक पॅनेलवर टीका

१९ वर्षीय अंतिम पंघाल हिने २०२३मधील जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावत पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवली होती. ऑलिंपिकची पात्रता मिळवणारी ती भारताची पहिलीच कुस्तीपटू ठरली होती. मात्र, तिचे वैयक्तिक प्रशिक्षक भगत सिंग, विकास व फिजिओथेरेपिस्ट हिरा यांना अद्याप व्हीसाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणावर पी. टी. उषा यांनी निलंबित कुस्ती संघटनेचे ॲड हॉक पॅनेलवर टीका केली आहे.

प्रशिक्षकांचा व्हीसा मिळवण्याचा प्रयत्न

पी. टी. उषा म्हणाल्या, आमच्याकडून सर्व नावांची यादी पुढे करण्यात आली होती. ॲड हॉक पॅनेलकडून अंतिम पंघालच्या प्रशिक्षक व स्टाफच्या नावांची यादी देण्यात आली नाहीत. तसेच, स्पोर्ट्‌स ऑथोरिटी ऑफ इंडियाकडूनही (साई) या प्रकरणाची दखल घेण्यात आली नाही.

अंतिम पंघाल आपल्या प्रशिक्षकांच्या व्हीसाबाबत थेट आमच्याकडे आली असती तर फ्रान्सच्या दूतावासाकडून व्हीसा प्रकरण सोडवण्यात आले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. व्हीसा प्रक्रिया जलद गतीने होण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, कुस्तीपटू ३ ऑगस्ट रोजी पॅरिसला पोहोचणार असून २ ऑगस्ट रोजी प्रशिक्षकांचे बायोमेट्रिक्स होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com