Vinesh Phogat Paris Olympic Silver Medal: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील हक्काचे रौप्यपदक मिळणार की नाही, याचा फैसला आज होईल अशी अपेक्षा होतीा. ५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी झालेल्या चाचणीत विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त आढळले. त्यामुळे तिच्यावर ऑलिम्पिक समितीने अपात्रतेची कारवाई केली होती. त्याविरोधात कुस्तीपटूने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती आणि किमान संयुक्त रौप्यपदक दिले जावे अशी विनंती केली होती. आज निकाल येणं अपेक्षित होता, परंतु तिसऱ्यांदा या निकालासाठी मुदतवाढ दिली गेली आहे.
५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी नियमाप्रमाणे दोन्ही खेळाडूंचं वजन केलं गेलं. त्यात भारतीय कुस्तीपटूचं वजय १०० ग्रॅम अधिक भरलं आणि त्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली. विनेशविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूला फायनलमध्ये एन्ट्री दिली गेली. ऑलिम्पिक समितीने ही कारवाई नियमाला धरूनच केल्याचा दावा केला. त्यामुळे विनेशला पदकापासून वंचित रहावे लागले.
दिवसाला तीन बाऊट खेळल्यानंतर विनेश फोगाटचे वजन २ किलोने वाढल्याचे निदर्शनास आले. ते कमी करण्यासाठी विनेश आदल्या रात्री झोपलीही नाही. तिने रात्रभर कसरत करून वजन कमी करण्यावर भर दिला. काही मीडिया रिपोर्टनुसार तिने शरीरातील रक्तही काढले आणि केसही कापले. इतकं करूनही तिचे वजन १०० ग्रॅम अधिक राहिले. त्यामुळे त्याला फायनलला मुकावे लागले.