Olympic 2024 Vinesh Phogat Appeal IOC CAS Live : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आजच निर्णय येणार आहे. हे स्पष्ट झाले आहे. क्रीडा लवादाने पत्रक काढून ही माहिती दिली आहे. काल विनेशच्या याचिकेवर तीन तास युक्तिवाद रंगला. विनेशला ५० किलो वजनी गटाच्या फायनलपूर्वी वजन १०० ग्रॅम जास्त झालं म्हणून अपात्र ठरवले गेले. याविरोधातत विनेशने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती आणि ज्येष्ठ वकिल हरीश साळवे ही विनेशची बाजू मांडली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेला ( IOA) सकारात्मक निकाल येईल अशी आशा आहे.
विनेश फोगाटच्या याचिकेवर सुनावणी २ फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली.
प्रथम विनेशच्या फ्रेंच वकिलांनी युक्तिवाद सुरू केला. त्यानंतर UWW आणि नंतर IOC व शेवटी IOA यांचे प्रतिनिधित्व हरीश साळवे यांनी युक्तिवाद केले. हरीश साळवे एक तास १० मिनिटे बोलले आणि विनेशची बाजू मांडली.
दुसऱ्या फेरीत फ्रेंच वकिलांनी UWW त्यानंतर IOA आणि IOC यांनी आपापली भूमिका मांडली. आता CAS वैद्यकीय आयोगाचा अहवालही मागणार आहेत. पुढच्या दिवसात अंतिम निकाल अपेक्षित आहे.
विनेश फोगाटने यावेळी क्रीडा लवादाला तिची बाजू कशी योग्य आहे, हे समजावण्याचा जोरदार प्रयत्न केला. विनेशने कोणताही फसवणुक केलेली नाही, हे तिच्या वतीने क्रीडा लवादाला पटवून देण्याचा प्रयत्न झाला. वरिष्ठ वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया ज्यांनी यापूर्वी अनेक खेळाडूंसाठी लढा दिला आहे. त्यांनी सुनावणीदरम्यान विनेशची बाजू मांडली.
विनेशच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की मंगळवारी संध्याकाळी वाढलेले वजन शरीराच्या नैसर्गिक रिकव्हरी प्रक्रियेमुळे होते आणि त्याच्या/तिच्या शरीराची काळजी घेणे हा खेळाडूचा मूलभूत अधिकार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिच्या शरीराचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा कमी होते, वजन वाढणे केवळ रिकव्हरीमुळे झाले आणि ही फसवणूक नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.