Break Dancer Rachael Gunn Announced Retirement: ऑस्टेलियन ब्रेक डान्सर राचेल गन हिने पॅरीस ऑलिम्पिकमधील अस्वस्थ अनुभवामुळे ब्रेक डान्सिंग या क्रीडाप्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. राचेल गन हिला बी-गर्ल रेगन नावानेही ओळखतात. तिच्या २०२४ पॅरिस ऑलिम्पिकधील डान्स स्टेप्सची सोशल मीडियावर टिंगल केली गेली आणि त्यामुळे तिने पुन्हा स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ब्रेक डान्सिंग या क्रीडाप्रकारचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाची राचेल गन ही देखील सहभागी झाली होती. पण, तीन सादर केलेल्या ब्रेक डान्सवर नेटकऱ्यांनी अनेक मिम्स बनवले. या स्पर्धेनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्याचबरोबर तिला असंख्या टीकांना सामोरे जावे लागले. यामुळे तिने ब्रेक डान्सिंगमधून निवृत्ती घेतली आहे.
ऑस्ट्रेलियातील जिम्मी आणि नाथ शॉ या कार्यक्रमात ती म्हणाली, " मी यापुढे स्पर्धेत सहभागी होणार नाही. मी आत्तापर्यंत स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे, पण, यापुढे स्पर्धेत सहभागी होणे माझ्यासाठी शक्य नाही. मी अजूनही डान्स करू शकते. डान्स हा माझ्या जोडीदाराप्रमाणे नेहमीच माझ्या सोबत राहील. पण, लोकांवर मी नियंत्रण मिळवू शकत नाही आणि हे माझ्यासाठी खूप निराशाजनक आहे."
ऑस्ट्रेलियामध्ये हॅलोविनच्या एका कार्यक्रमातही रेगन गेली असताना अनेकांनी तिच्या पोशाखाची आणि तिच्या नृत्याची नक्कल केली. 'फॉक्स १०१.९ मेलबर्नच्या फिफी, फेव्ह आणि निक फॉर ब्रेकफास्ट'ला दिलेल्या मुलाखतीत, रेगनने तिची नक्कल करणाऱ्या लोकांना शोधण्याची विनंती केली.
रेगनने अलीकडे फाइंडर नावाच्या कंपनीसह, सर्वोत्तम डान्सरसाठी ५००० डॉलर आणि दोन किंवा अधिक लोकांच्या सर्वोत्तम गृप डान्ससाठी १०००० डॉलर रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
“मी ऐकले आहे की तुमच्यापैकी काही लोकं माझ्यापेक्षा चांगला डान्स करू शकतात. खरंच? चला मग शोधूया ?" तिने बक्षीस जाहीर करतानाच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.