Paris Olympic Car Accident : मोठी बातमी! भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, आई हॉस्पिटलमध्ये

Paris Olympic 2024 Diksha Dagar - ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झालेल्या भारतीय खेळाडूच्या गाडीचा अपघात झाला आहे. तिच्यासोबत तिचे कुटुंबीय होते.
dikshadagar
dikshadagarsakal
Updated on

Diksha Dagar car crash in Paris - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतीयांसाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिचा पॅरिसमध्ये ३० जुलै रोजी कार अपघात झाला होता आणि ती बातमी आज PTI ने दिली आहे. २३ वर्षीय खेळाडूला फार दुखापत झाली नसून ती सुरक्षित आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वैयक्तिक गोल्फ स्पर्धेसाठी ती सहभाग घेण्याची अपेक्षा आहे. दीक्षा ७ ऑगस्टपासून खेळताना दिसणार आहे.

मंगळवारी संध्याकाळी दीक्षा, तिचे आई-वडील आणि भाऊ कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातात दीक्षा आणि तिचे वडील जखमी झाले, तर तिच्या आईच्या पाठीला दुखापत झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.दीक्षाच्या भावाला किरकोळ दुखापत झाली.

दक्षिण आफ्रिकेची गोल्फर पॉला रेटोने माघार घेतल्यानंतर दिक्षाला टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या क्षणाला एन्ट्री मिळाली होती. तेव्हा तिने T-50 पूर्ण केले होते आणि पॅरिसमध्ये चांगली कामगिरी करण्यावर तिने लक्ष केंद्रित केले आहे.

हरयाणाच्या झज्जर गावातील दीक्षा दिल्लीत वास्तव्यास आहे. २०१८ मध्ये तिने व्यावसायिक गोल्फ खेळण्यास सुरुवात केली. ती लेडीज युरोपियन टूरचे विजेतेपद पटकावणारी सर्वात तरुण भारतीय आणि एकूणच फक्त दुसरी भारतीय खेळाडू ठरली. कमकुवत श्रवणशक्तीसह जन्मलेल्या या गोल्फरने २०१७ च्या उन्हाळी डेफ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे आणि २०१८ च्या आशियाई स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

दीक्षा तिच्या खेळामधील यशाचे श्रेय तिच्या गोल्फपटू वडिलांना देते. सहा वर्षांची असताना तिचा गोल्फशी परिचय झाला, तेव्हा कर्नल डागर यांनीच आपल्या मुलीला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. दीक्षा टेनिस, बॅडमिंटन आणि स्विमिंग हे खेळदेखील खेळते. २०१२ मध्ये इंडियन गोल्फ युनियनच्या (आयजीयू) उप-कनिष्ठ सर्किट या तिच्या पहिल्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर दीक्षाने या खेळातच कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला.

गोल्फ हा एक महागडा खेळ असल्याने तिला हा खेळ फक्त एक हौशी खेळाडू म्हणून खेळणे परवडणारे नव्हते, कारण देशातील एखाद्या स्पर्धेसाठी जवळपास ३५ ते ४० हजार रुपये इतका अंदाजे खर्च येतो. तिच्यासमोर आणखी एक आव्हान होते. ते म्हणजे ती डावखुरी असल्याने तिच्यासाठी योग्य अशी उपकरणे उपलब्ध नव्हती. डावखुऱ्या दीक्षासाठी गोल्फ क्लब शोधणे अवघड झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.