तांदुळ, चहा, गाई, कार अन् घर! ऑलिम्पिक विजेत्यांना कोणता देश किती व काय काय देतो? वाचा सविस्तर

Paris Olympic 2024 rewards for medalists : गळ्यात पदक, मॅस्कॉट म्हणून एक टॉय आणि एक मिस्टीरियस बॉक्स या व्यतिरिक्त ऑलिम्पिक पदक विजेत्यांना IOC कडून काही वेगळं बक्षीस मिळत नाही. पण, देशाचं नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूंना त्यांचे देश भारी बक्षीसं देतात.
Olympic prize by country
Olympic prize by country esakal
Updated on

Country wise Olympic medal rewards: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत शंभरहून अधिक पदकांचे वितरण झाले असेल... १४ सुवर्ण, १० रौप्य व ९ कांस्य अशा एकूण ३३ पदकांसह चीन अव्वल स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन व अमेरिका हे अव्वल पाच देशांमध्ये आपली जागा पकडून आहेत. ऑलिम्पिकच्या एका पदकाचं मोल कोणताही खेळाडू शब्दात सांगू शकत नाही, कारण यासाठी त्याने एका तपाहून अधिक काळ कष्ट उपसलेले असतात. त्यामुळेच ऑलिम्पिक स्पर्धेत जरी पदकविजेत्यांना रोख बक्षीस मिळत नसले तरी त्यांचा देश याची काळजी घेतो. या खेळाडूंना बोनस म्हणून बऱ्याच अशा गोष्टी दिल्या जातात ज्याचा विचारही आपण कधी केला नसेल..

CNBC ने विविध देशांच्या ऑलिम्पिक समिती, क्रीडा संघटना आणि स्थानिक वृत्तानुसार एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात कोणता देश ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंना किती रोख रक्कम देतो आणि त्याशिवाय काही बोनस वस्तू देतात ही माहिती दिली आहे.

ऑलिम्पिक पदक विजेत्यांना बक्षीस

देश सुवर्णपदक रौप्यपदक कांस्यपदक

हाँगकाँग 64356403 32178201 16089100

सिंगापूर 62429063 31256430 15586316

इंडोनेशिया 25139220 12569610 5027844

इस्राईल 22709095 18100238 11312649

कझाकस्तान 20949350 12569610 6284805

मलेशिया 18100238 5446831 1843542

स्पेन 8547334 4357464 2765314

भारत 7500000 5000000 3500000

फ्रान्स 7290373 3603288 1843542

द. कोरिया 3770883 2094935 1508353

अमेरिका 3184301 1927340 1256961

( ही रक्कम भारतीय रकमेत मांडलेली आहे)

सर्वाधिक बक्षीस देणारा देश...

हाँगकाँग आणि सिंगापूर हे दोन देश ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना सर्वाधिक रोख रक्कम बक्षीस देतात. हाँगकाँगने त्यांच्या खेळाडूंसाठीच्या रोख रकमेत टोकियो ऑलिम्पिकपेक्षा २० टक्के वाढ केली आहे. हाँगकाँगमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ( $768,000) जवळपास साडेसहा कोटी दिले जातात... रौप्य व कांस्यपदक विजेत्याला अनुक्रमे ३ मिलियन आणि १.५ मिलियन हाँगकाँग डॉलर एवढी रक्कम मिळते.

  • सिंगापूरमध्ये सुवर्णदक विजेत्या खेळाडूलाही सहा कोटी ( $745,300) दिले जातात. रौप्यपदक विजेत्याला ५ लाख डॉलर आणि कांस्यपदक विजेत्याला २.५० लाख डॉलर बक्षीस दिले जाते.

  • इस्राईल, मलेशिया, कझाकस्तान आणि इंडोनेशिया हे देशही त्यांच्या खेळाडूंना सहा अंकी रोख रक्कम दिली जाते. फ्रान्सनेही त्यांच्या बक्षीस रकमेत प्रचंड वाढ केली आहे आणि ती रक्कम सुवर्णपदक विजेत्यासाठी १५ हजार युरोवरून ८० हजार युरो इतकी पोहोचली आहे.

भारतीयांना किती बक्षीस...

  • भारताच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला केंद्र सरकार ७५ लाख देतात, तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून १० लाख रक्कम देणार असल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.

गाडी, गाई अन् अपार्टमेंट...

  • रोख रकमेव्यतिरिक्त काही खेळाडूंना सरकार आणि खाजगी कंपन्यांकडून अपार्टमेंट आणि कार यासारखे अतिरिक्त बक्षीस दिले जाते.

  • कझाकिस्तान ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी २.५ मिलियन डॉलर, रौप्यपदकासाठी १.५ मिलियन डॉलर आणि कांस्यपदकासाठी ७५,००० डॉलर रक्कम देतात. शिवाय पदक विजेत्या खेळाडूंना अपार्टमेंट देखील दिले जाते.

  • मलेशियातील काही खाजगी कंपन्यांनी पदकविजेत्या खेळाडूंना लक्झरी-सर्व्हिस अपार्टमेंट्स किंवा अतिरिक्त रोख बक्षीसं दिल्या आहेत.

  • दक्षिण कोरियातील पदकविजेत्यांना रोख बक्षीस रकमेसह पेंशन दिली जाते. ही पेंशन सुवर्णपदक विजेत्यासाठी ६७.२ मिलियन, रौप्यपदकासाठी ३५ मिलियन आणि कांस्यपदकासाठी २५ मिलियन डॉलर अशी लमसम पेंशन दिली जाते.

  • काही खेळाडूंना मोफत ड्रिंक्स आणि ट्रान्सपोर्टेशन दिले जाते. हाँगकाँगची MTR Corp ही सार्वजनिक वाहतुक सेवा पुरवणारी कंपनी पदकविजेत्या खेळाडूंना आयुष्यभर मोफत प्रवास देते.

  • पोलिश खेळाडूंना हॉलिडे वाऊचर, स्कॉलरशीप आणि डायमंड दिले जातात, असे तेथील स्थानिक मीडियाचा दावा आहे.

  • मलेशियन खेळाडूंना Teh tarik हे त्यांचे प्रसिद्ध हॉट मिल्क टी हे पेय आयुष्यभर मोफत दिले जाते. दक्षिण आशियात Teh tarik हे खूप प्रसिद्ध आहे.

  • जपानमध्ये खेळाडूंना तांदळाच्या १०० पिशव्या गिफ्ट म्हणून दिल्या गेल्या आहेत, तर इंडोनेशियाने त्यांच्या सुवर्णपदक विजेत्या बॅडमिंटनपटू आप्रियानी राहायू व ग्रेयसीया पॉली यांना पाच गाई, एक रेस्ट्रॉ आणि नवीन घर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.