तिला प्रपोज करण्यासाठी त्याने प्रेमाचं शहर निवडलं; ऑलिम्पिकच्या 'कोर्टा'त भारी प्रपोज Video Viral

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आतापर्यंत सात दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. आणि सगळे देश जास्तीत जास्त पदके जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी ऑलिम्पिकमध्ये काही वादही पाहायला मिळत आहेत....
China's Huang Yaqiong gets Olympic gold medal and marriage proposal
China's Huang Yaqiong gets Olympic gold medal and marriage proposalsakal
Updated on

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आतापर्यंत सात दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. आणि सगळे देश जास्तीत जास्त पदके जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी ऑलिम्पिकमध्ये काही वादही पाहायला मिळत आहेत. पण या सगळ्यामध्ये 'प्रेमाच्या या पॅरिस शहरात' चाहत्यांना काही चांगले क्षणही पाहायला मिळाला. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती चीनची बॅडमिंटनपटू हुआंग या कियोंग हिला तिचा प्रियकर लियू यू चेनने प्रपोज केले, जो आता चर्चेचा विषय बनला आहे.

China's Huang Yaqiong gets Olympic gold medal and marriage proposal
India at Paris Olympic 2024 Live : Manu Bhaker चे तिसरे ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं, शूट ऑफमध्ये बाद

खरं तर, शुक्रवारी (02 ऑगस्ट) चीनच्या हुआंग या कियोंगने बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत झेंग सिवेईसह सुवर्णपदक जिंकले. या विजयानंतरच हुहुआंग या कियोंगला तिचा प्रियकर लिऊ युचेनने प्रपोज केले होते. आणि आत त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लियू युचेन आधी तिला पुष्पगुच्छ दिला आणि नंतर त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि अंगठीसह तिला प्रपोज करतो. हुआंग या कियोंग पण हा लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकली नाही आणि तिने अंगठी घातली, नंतर लिऊ युचेनला मिठी मारली.

China's Huang Yaqiong gets Olympic gold medal and marriage proposal
SL vs IND : 'एक रन राहिला होता पण आम्ही...' सामना बरोबरीत सुटल्यानंतर रोहित संतापला

उल्लेखनीय आहे की, चीनच्या हुआंग याकिओंग आणि झेंग सिवेई यांच्या मिश्र संघाने दक्षिण कोरियाच्या किम वोन हो आणि जेओंग ना युन यांचा 21-8, 21-11 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.