Imane Khelif : महिला बॉक्सिंगमध्ये वादग्रस्त ठरलेल्या इमाने खलिफचा 'गोल्ड'न पंच, अश्रू अनावर

Olympic 2024 Controversy: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनेही वादाची परंपरा कायम राखली. अल्जेरियन बॉक्सर इमाने खलिफ ती नसून तो असल्याचा दावा प्रतिस्पर्धींनी केला होता.
Imane Khelif
Imane Khelifesakal
Updated on

Algerian boxer Imane Khelif gold medal : अल्जेरियन बॉक्सर इमाने खलिफने महिलांच्या ६६ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये चीनच्या लियूचा पराभव करून गोल्ड मेडल जिंकले. खलिफची ऑलिम्पिक स्पर्धेतील सुरुवात वादाने झाली होती आणि तो ती नसून तो असल्याचा आरोप केला गेला. ज्या खलिफला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने पुरुष असल्याच्या कारणावरून निलंबित केले होते, तो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटातून खेळल्याने वाद झाला होता. पण, ऑलिम्पिक समितीने खेळण्याची परवानगी दिली आणि खलिफने सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकल्यावर खलिफचे डोळे पाणावले.

खलिफने महिला बॉक्सिंग welterweight गटाच्या पहिल्या लढतीत इटलीच्या अँजेला कॅरिनीचा ४६ सेकंदात पराभव केला. खलिफने जोरात पंच मारल्याने कॅरिनीच्या नाकाला जबर मार बसला आणि ती प्राथमिक उपचार घेण्यासाठी तिच्या प्रशिक्षकाकडे गेली. तिने तिचे हेडगिअर सरळ केले आणि पुन्हा लढण्यासाठी आली, परंतु ती पुन्हा कॉर्नरवर परतली आणि सामन्यातून माघार घेतली.

महिलांच्या स्पर्धेत बायोलॉजिकली पुरुष असलेला खेळाडू खेळल्याचा दावा केला गेला. महिलांच्या स्पर्धांमध्ये XY गुणसूत्र असलेल्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (IBA) २०२३च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरवले होते आणि तेव्हापासून २५ वर्षीय खलिफ चर्चेत आहे.

“मी खूप आनंदी आहे. आठ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न खरं झालं आणि आता ऑलिम्पिक चॅम्पियन आणि सुवर्णपदक विजेती आहे. मी आठ वर्षे खूप कष्ट घेतले,” असेही खलिफ म्हणाली.

Imane Khelif
Olympic 2024 boxing controversy: अँजेला कारिनी आणि इमान खलिफे यांच्या निमित्ताने लिंग समानतेचा मुद्दा का चर्चेला येतोय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.