Champions Trophy 2025 host: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळाचे वातावरण आहे. पाकिस्तानसोबत असलेले राजकीय संबंध लक्षात घेता केंद्र सरकारचाही टीम इंडियाला पाठवण्याला विरोध आहेच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही हा मॅसेज पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB ) कळवला आहे. त्यामुळे त्यांची चिडचिड होणे स्वाभावीक आहे.
त्यांनीही आयसीसीला पत्र पाठवून भारतीय संघ नेमकं कोणत्या कारणामुळे पाकिस्तानात येण्यास नकार देत आहे, याचे स्पष्टिकरण मागितले आहे. त्याचवेळी पाकिस्तान सरकरानेही ताठर भूमिका घेतली आहे आणि कोणत्याही परिस्थिती नमतं घ्यायचं नाही, अशा सूचना PCB ला केल्या आहेत. पण, त्यात आता आयसीसीने एक प्रोमो जाहीर केला आहे आणि त्यात त्यांनी पाकिस्तानच यजमान असेल, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.