Broadcaster Legal Action against ICC : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास तयार नाही, तेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) हायब्रिड मॉडेलसाठी इच्छुक नाही. आता भारत-पाकिस्तान या शेजाऱ्यांच्या वादात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) वाईट प्रकारे फसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्यच आता टांगणीला लागले आहे. पाकिस्तानात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाठवण्यास BCCI आणि केंद्र सरकारचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हा गुंता सोडवण्यासाठी आयसीसी जमेल तसे प्रयत्न करत आहे. आता त्यांच्यावरच कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे.