Champions Trophy 2025 पूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी घडामोड; Babar Azam च्या हकालपट्टीचा प्लान तयार, संघातच प्रतिस्पर्धी

Babar Azam Captaincy : पुढच्या वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे आणि त्यापूर्वी मोठी घडामोड घडताना दिसतेय.
Babar azam
Babar azamesakal
Updated on

Babar Azam likely to sacked from Captaincy: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB) मोठ्या घडामोडी घडताना दिसणार आहेत. नुकतंच पाकिस्तान संघाला घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत बांगलादेशकडून २-० असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. माजी कर्णधार बाबर आजमला या मालिकेत अपयश आले. मागील १० कसोटीत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. अशात आता त्याच्या हकालपट्टीचा प्लान तयार केला जात आहे.

कसोटीपाठोपाठ बाबरकडून मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व काढून घेण्याच्या हालचाली वेग पकडत आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) हा बाबरचा स्पर्धक म्हणून समोर उभा राहिला आहे. Geo News ने दिलेल्या वृत्तानुसार मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील संघाचे नेतृत्व बाबरकडून रिझवानच्या हाती जाण्याची तयारी सुरू आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत पाकिस्तानच्या वन डे संघाचे नेतृत्व बाबरला देण्यास विरोध आहे.

Babar azam
ENG vs SL 3rd Test: ७ देश, ७ शतकं! Ollie Pope चा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असे कुणालाच जमले नाही अन् जमण्याची शक्यता कमीच

पाकिस्तानच्या वन डे संघाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत शाहीन शाह आफ्रिदी, रिझवान, शादाब खान, सौद शकील आणि मोहम्मद हॅरिस यांची नावं चर्चेतत आहेत, परंतु बाबरचं नावच नाही. पाकिस्तानचा संघ नोव्हेंबरच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ व डन वे ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. वृत्तानुसार मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनीही या संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली आणि बाबर यानेही दोन महिन्यांपूर्वी कर्णधारपदाचा मुद्दा मांडला होता.

Babar Azam | Pakistan
Babar Azam | PakistanSakal

रिझवान नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाल्यास भविष्यात त्याच्याकडे तिन्ही फॉरमॅटची कॅप्टन्सी दिली जाऊ शकते. त्यामुळे सध्याचा कसोटी संघाचा कर्णधार शान मसूद याचेही स्थान धोक्यात आहे. ३१ मार्चला बाबर याची मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती केली गेली होती. बाबरला ११७ वन डे सामन्यांत ५६.७२च्या सरासरीने ५७२९ धावा करता आल्या आहेत. त्यात १९ शतकं व ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. १२३ ट्वेंटी-२०त पाकिस्तानसाठी त्याने ४१४२ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर ३ आंतरराष्ट्रीय शतकं आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.