Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट मंडळाने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानमध्ये खेळण्यास स्पष्ट आणि ठाम नकार कायम ठेवल्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड होत आहे. आता त्यांचे सरकार पुढे आले आहे. या स्पर्धेतला एकही सामना इतरत्र हलवू देऊ नका, असा संदेश पाकिस्तान सरकारने त्यांच्या क्रिकेट मंडळाला दिला असल्याचे समजते. या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आपल्याला मिळालेले आहेत, त्यामुळे संपूर्ण स्पर्धा आपल्या देशात व्हायला हवी. यातील एकही सामना दुसऱ्या देशात होऊ देऊ नका, अशी भूमिका पाकिस्तान सरकारने घेतली आहे.