pakistan cricket board ready for Hybrid Model- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर येण्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले. भारतीय संघाचे सर्व सामने लाहोर येथे खेळवण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला, सुरक्षेची भीती वाटत असेल तर सामना झाल्यावर नवी दिल्लीत जाण्याचा पर्यायही PCB ने सुचवला, ICC कडे रडारडही केली.. पण, अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) जे हवे होते तेच झाले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर हार मानली आणि BCCI समोर पुन्हा शरणागती पत्करण्याची वेळ आली आहे. आशिया चषक २०२३ प्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यास पाकिस्तानचा विरोध होता, पण आता BCCI ऐकत नाही हे समजताच त्यांनी हार मानली.