Jay Shah ICC Chairman: चेअरमन होताच जय शाह यांची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं वाढलं टेंशन

ICC New Chairman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
Jay Shah New Chairman of ICC
Jay Shah New Chairman of ICCesakal
Updated on

Champions Trophy Jay Shah New Chairman of ICC:

न्यूझीलंडच्या ग्रेग बार्क्ले यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) अध्यक्षपदाची तिसरी टर्म लढवणार नसल्याचे जाहीर केले आणि तेव्हाच जय शाह यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. BCCI सचिव जय शाह यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबदबा पाहता त्यांना विरोध करणे कठीणच होते. त्यामुळेच आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांच्याविरोधात कोणीच अर्ज केला नाही आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. जय शाह यांच्या निवडीमुळे Pakistan Cricket Board ची चिंता वाढली आहे. का,चला जाणून घेऊया?

आयसीसीने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, अध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तेव्हाच निवडणुका होतील. या पदासाठी जय शाह हे एकमेव उमेदवार असल्याची पुष्टी मंगळवारी झाली आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. ३५ वर्षीय जय शाह हे ICC चे नेतृत्व करणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर आयसीसीचे नेतृत्व करणारे ते भारतातील पाचवे व्यक्ती आहेत.

आयसीसी अध्यक्षांची यादी:

  • एन श्रीनिवासन (२६ जुलै २०१४ ते ९ नोव्हेंबर २०१५)

  • शशांक मनोहर ( २२ नोव्हेंबर २०१५ ते ३० जून २०२० )

  • इमरान ख्वाजा ( १ जुलै २०२० ते २३ नोव्हेंबर २०२०

  • ग्रेग बार्कले ( २४ नोव्हेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२४ )

  • जय शाह ( १डिसेंबर २०२४ पासून)

य शाह हे ऑक्टोबर २०१९ पासून बीसीसीआयचे सचिव आणि जानेवारी २०२१ पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि ते १ डिसेंबर २०२४ रोजी ICC ची सूत्र हाती घेतील.

काय म्हणाले जय शाह?

''आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे. जागतिक स्तरावर क्रिकेटला आणखी मोठी उंची मिळवून देण्यासाटी मी ICC टीम आणि सदस्य देशांसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही एका गंभीर टप्प्यावर आहोत, जिथे एकापेक्षा अधिक फॉरमॅटचे एकत्रीकरण आणि समतोल राखणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये प्रमुख स्पर्धांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. क्रिकेटला पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय बनवण्याचा आमचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.

जय शाह पुढे म्हणाले, “आम्ही जे शिकलो त्यावरून आम्ही नवीन विचार आणि नवकल्पना स्वीकारली पाहिजे. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिेकेटचा समावेश आहे आणि हा क्रिकेटच्या वाढीची ही संधी आहे."

PCB टेंशनमध्ये का? Champions Trophy

जय शाह यांच्यासमोर पहिलीच टाक्स ही चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या यशस्वी आयोजनाची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे आणि भारताचा तेथे खेळण्यास जाणार विरोध आहे. अशात BCCI ने आशिया चषक २०२३ प्रमाणे हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला आहे. आता जय शाहच अध्यक्ष झाल्याने PCB चं टेंशन वाढणे साहजिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.