शेर हैं हम; भारतात येऊन खेळलो, तुम्ही पाकिस्तानात या...! माजी खेळाडू बरळला Video

Champions Trophy 2025: Pakistan's Ex-Bowler Challenge to Team India; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणखी एक यजमानपद BCCI मुळे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत, कारण पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात संघ पाठवण्यास त्यांचा नकार आहे.
India vs Pakistan champion trophy 2025
India vs Pakistan champion trophy 2025sakal
Updated on

Team India Participate in Champions Trophy 2025? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाचे पुढील लक्ष्य हे पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हे आहे. पण, एक अडचण आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) दिले आहे आणि त्यामुळे BCCI ने संघ पाठवणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. अशात २०२३च्या आशिया चषक स्पर्धेप्रमाणे चॅम्पियन्स ट्ऱॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये म्हणजेच भारताचे सामने पाकिस्तानाबाहेर खेळवण्यात येऊ शकते.

पण, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू खवळले आहेत आणि ते भारतीय संघाला आव्हान देताना दिसत आहेत. फिरकीपटू हरभजन सिंगने ( Harbhajan Singh) भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊच नये, असा ठाम पवित्रा घेतला आहे. त्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमदने ( Tanvir Ahmed ) भज्जीवर टीका केली. त्याने यावेळी २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात आल्याचा दाखला त्याने दिला.

India vs Pakistan champion trophy 2025
MS Dhoni चा IPL मधील प्रवास संपला? BCCI चा निर्णय 'गेम' करणार, धोनीची CSKच्या मालकांशी चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये तन्वीर अहमदने पाकिस्तान क्रिकेट संघ “शूर आणि निर्भय” असल्याचा दावा केला. “शेर है हम लोग, शेर है! हम लोग तेरे मुल्क में आ के खेल के गये है. तू आके दिख… हम तो कह रहे है की यहाँ आके खेलो. सुरक्षा देंगे, सब कुछ देंगे तुम लोगों को. आ तो सही एक दफा,''असे त्याने म्हटले.

India vs Pakistan champion trophy 2025
MS Dhoni खूप पुढे आहे...! हरभजन सिंगने पाकिस्तानी पत्रकाराला धुतले

''आम्ही तुमच्या देशात येऊन खेळलो आहोत. तुम्ही पण या आणि प्रात्यक्षिक दाखवा. आम्ही तुम्हाला सर्व काही देण्याचे आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचे वचन देतो. फक्त एकदा या,” असे तन्वीर अहमदचे म्हणणे आहे. ''हे फक्त पाकिस्तानचे खेळाडूच करतात. फक्त पाकिस्तानी खेळाडू भारतात जातात आणि खेळतात. तिथे जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नाही, तर खेळणे महत्त्वाचे आहे. ते भारतात गेले आणि तिथे खेळून परतले. यालाच तुम्ही शूर संघ आणि धाडसी खेळाडू म्हणतो,” असेही तो पुढे म्हणाला.

PCB ने आश्वासन दिले आहे की भारतीय संघाचे सर्व सामने लाहोरमध्ये होतील. भारत सरकारने पाकिस्तान आणि भारत यांच्यातील क्रिकेट सामने ICC किंवा ACC कार्यक्रमांपुरते मर्यादित ठेवले आहेत. त्यामुळे २०१२ पासून दोन्ही देशांनी द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.