टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणारच नाही, ICC ने एकप्रकारे केले मान्य! घेतला मोठा निर्णय

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळ आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.
ICC for 2025 Champions Trophy Pakistan
ICC for 2025 Champions Trophy Pakistan News Marathisakal
Updated on

ICC Budget for 2025 Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या जागतिक स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीलाही जोरदार सुरुवात केली आहे. परंतु, असं असलं तरी या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार का, याचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आयसीसीनेच आता मोठा निर्णय घेतल्याचे समजत आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाने जर पाकिस्तानला जाण्यास नकार दिला, तर अशा अनेक शक्यतांचा विचार करून वार्षिक सर्वसाधारण सभेत साधारण ६५ मिलियन डॉलर बजेट मंजूर केले आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आयीसीची सर्वसाधारण बैठक काही दिवसांपूर्वीच कोलंबोमध्ये पार पजली होती. दरम्यान, जे बजेट मंजूर करण्यात आले आहे, त्यात दर काही सामने पाकिस्तान बाहेर खेळवण्याचा निर्णय झाला, तर त्याच्या खर्चाचाही या बजेटमध्ये विचार करण्यात आला आहे.

दरम्यान, या बैठकीत भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सहभागाबाबत फारशी चर्चा झाली नसल्याचेही समजत आहे.

ICC for 2025 Champions Trophy Pakistan
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे पाकिस्तानात न जाणे शेजाऱ्यांच्या पथ्यावर पडणार; ICC ने दिले मोठे अपडेट्स

मुख्य कार्यकारी समितीने मंजूरी पत्रात लिहिलं आहे की 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यजमानपदाच्या करारावर स्वाक्षरी केली असून ते F&CA कडे मंजूरीसाठी पाठवण्यात आलेल्या स्पर्धेच्या बजेटच्या ड्राफ्टवर व्यवस्थापनासह काम करतील. व्यवस्थापनाने जर काही सामने पाकिस्तानबाहेर खेळवायचे झाले, तर त्याचा विचार करूनही अधिकचा खर्च गृहित धरून अंदाजे बजेट मंजूर केले आहे. '

'मार्च २०२४ मध्ये पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांची ठिकाणे तपासण्यात आले आहेत. सध्या तिन्ही ठिकाणी त्यात सुविधांची वाढ करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहेत.'

ड्राफ्टनुसार लाहोर, कराची आणि रावळपिंडी ही ठिकाणं सामन्यांसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

ICC for 2025 Champions Trophy Pakistan
Champions Trophy 2025 - हम अच्छे लोग है...! भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये यावे, Shoaib Malik ची विनवणी

दरम्यान बजेटमधील साधारण ३५ मिलियन डॉलर स्पर्धेसाठी मंजूर करण्यात आला आहे, तर २० मिलियन डॉलर सहभाग आणि बक्षीसासाठी असेल, तर १० मिलियन डॉलर प्रोडक्शन कॉस्ट असेल.

तसेच असेही समजत आहे की सध्याचे तात्पुरत्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट सर्व गुंतवणुकदार,ज्याच ब्रॉडकास्टर आणि सर्व सहभागी संघांचा समावेश आहे, त्यांना पाठवण्यात आला आहे. या ड्राफ्टनुसार भारताचे सर्व सामने लाहोरला होतील.

तसेच भारत-पाकिस्तान सामना १ मार्च २०२५ रोजी होणार आहे. ही स्पर्धा पुढीलवर्षी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होणार आहे. तसेच १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान सराव सामने होऊ शकतात. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी तब्बल ८ वर्षांनंतर खेळवली जाणार आहे. यापूर्वी २०१७ साली ही स्पर्धा झाली होती.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.