Champions Trophyसाठी टीम इंडिया नाही जाणार पाकिस्तानात; ICCच्या जाळ्यात अडकली PCB, जाणून घ्या कारण

Champions Trophy 2025 Budget News : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे बजेट मंजूर केले आहे.
ICC for 2025 Champions Trophy Pakistan
ICC for 2025 Champions Trophy Pakistan News Marathisakal
Updated on

ICC Champions Trophy 2025 As Hybrid Model : पुढील वर्षी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद भूषवणार आहे. मेगा स्पर्धेसाठी सर्व संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

मात्र, याआधीही बीसीसीआयकडून चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नसल्याचे वक्तव्य आले होते. आता आयसीसीने असे केले आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ कोणत्याही किंमतीत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे.

2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ आपल्या देशात यावा यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पीसीबीने आयसीसी स्पर्धांचे वेळापत्रकही न मागता बनवले. त्यांच्या मते भारत आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळणार आहे. मात्र, पाकिस्तानचा हा डाव उलटणार आहे.

ICC for 2025 Champions Trophy Pakistan
Manu Bhaker : 'पिस्तूल क्वीन' मनू भाकरला मानाचं स्थान! Paris Olympicच्या निरोप समारंभात सोपवली महत्वाची जबाबदारी

आयसीसीच्या जाळ्यात अडकला पाकिस्तान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे बजेट मंजूर केले आहे. कोलंबोमध्ये झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने तयार केलेल्या बजेटमध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे मोठे संकेत दिले आहेत.

अहवालानुसार, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी $65 दशलक्ष बजेट मंजूर केले आहे. या स्पर्धेसाठी एवढी मोठी रक्कम खर्च करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर इतर कोणत्याही देशात म्हणजे हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित केली जाऊ शकते.

आयसीसीने बीसीसीआयचा मुद्दा मान्य केला असून भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कोठेतरी आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे, हे या बजेटमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.

ICC for 2025 Champions Trophy Pakistan
Gautam Gambhir : 'गंभीर टिकणार नाही कारण...' भारताला टी-20 चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

भारताचे कुठे होणार सामने?

गेल्या वर्षी जेव्हा पाकिस्तान आशिया कपचे आयोजन करत होता, तेव्हा भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही हायब्रीड मॉडेल अंतर्गत पाकिस्तानबाहेर खेळणार आहे. मात्र हे सामने कोठे होतील याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान होणार आहे. पीसीबीने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. सलामीचा सामना गतविजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.