Sourav Ganguly on Vinesh Phogat:भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आले. विनेशने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. मात्र अंतिम सामन्याआधी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिला सुवर्णपदकासाठी अंतिम सामना खेळताही आला नाही.
यानंतर या निर्णयाविरोधात विनेशने क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणावर भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुलीनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की तिला रौप्य पदक मिळायला हवं.