IND vs PAK: चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद ताजा, त्यात भारतीय संघाकडून पाकिस्तानला आणखी मोठी सजा! ट्वेन्टी-२० वर्ल्ड कपमधूनही माघार?

T20 World Cup for the Blind : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे. त्यामुळे सध्या हा वाद ताजा आहे. यातच आता चौथ्या दृष्टीहीन टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Indian Blind Cricket Team
Indian Blind Cricket TeamSakal
Updated on

Indian Blind Cricket Team : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या ठिकाणावरून सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जुंपल्याचे चित्र दिसत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. मात्र बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयसीसीने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने घ्यावी असा सल्ला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिला आहे.

आता यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेणार, हे स्पष्ट होणे बाकी आहे. यामुळे हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता असे समजत आहे की चौथ्या दृष्टीहीन टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Indian Blind Cricket Team
Champions Trophy 2025: भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तान स्पर्धेचे यजमानपद गमावणार? या देशात स्पर्धा होणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.