Jay Shah खिलाडूवृत्ती दाखवा; भारतीय संघ घेऊन पाकिस्तानात या! माजी खेळाडूची विनंती

Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे, परंतु टीम इंडिया येत नसल्याने PCB कडून विनवणी सुरू आहे.
jay shah
jay shahesakal
Updated on

former Pakistan player Younis Khan request Jay Shah: “जय शाह यांची आयसीसी प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने येणाऱ्या काळात त्यांच्याकडून क्रिकेटचा विकास झाला पाहिजे. जय शाह यांनी खिलाडूवृत्ती दाखवण्याची गरज आहे, कारण आयसीसी प्रमुखांच्या पुढाकारामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येऊ शकतो,''असे मत पाकिस्तानचा माजी खेळाडू युनूस खान याने व्यक्त केले.

पुढच्या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, परंतु BCCI ने संघ पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे २०२३च्या आशिया चषक स्पर्धेप्रमाणे ही स्पर्धाही हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) पुन्हा हतबल झाले आहेत. त्यात आता जय शाह यांनी आयसीसीच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्याने पाकिस्तानचे टेंशन वाढले आहे.

jay shah
Shakib Al Hasan IND vs BAN: शाकिब अल हसनवर हत्येचा गुन्हा; भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी BCB चा मोठा निर्णय

युनूस खान म्हणाला,''पाकिस्तानने गेल्या दोन दशकात भारतात अनेक सामने खेळले आहेत, परंतु २००८ च्या आशिया चषकानंतर भारतीय खेळाडू आमच्याकडे आलेले नाहीत. जय शाह आता ICC अध्यक्ष असल्याने, त्यांनी हा खेळ वाढवला पाहिजे आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी BCCI संघ पाठवेल याची खात्री करायला हवी. त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी एक दिशा घ्यायाला हवी."

१९९६ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानात यावे, असे पाकिस्तानच्या महान फलंदाजांपैकी एक युनूस खानला वाटते.

jay shah
डर अच्छा है! Jay Shah यांना १६ पैकी १५ मतं पडली; एक मत कुणी नाही दिलं, हे सांगायला नको

भारतीय संघाचे प्रस्तावित वेळापत्रक

जर भारत खरोखरच पाकिस्तानला गेला, तर त्यांचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळण्यात येणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) प्रस्तावित वेळापत्रकानुसार, भारत बांगलादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसोबत अ गटात आहे. ते २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी सामने खेळतील.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रस्तावित वेळापत्रक

  • १९ फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - कराची

  • २० फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध भारत - लाहोर

  • २१ फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कराची

  • २२ फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - लाहोर

  • २३फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध भारत - लाहोर

  • २४ फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – रावळपिंडी

  • २५ फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड - लाहोर

  • २६ फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – रावळपिंडी

  • २७ फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड - लाहोर

  • २८ फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया – रावळपिंडी

  • १ मार्च: पाकिस्तान विरुद्ध भारत - लाहोर

  • २ मार्च: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – रावळपिंडी

  • ५ मार्च: पहिली उपांत्य फेरी: TBC विरुद्ध TBC – कराची

  • ६ मार्च: दुसरी उपांत्य फेरी: TBC विरुद्ध TBC – रावळपिंडी

  • ९ मार्च अंतिम: TBC विरुद्ध TBC – लाहोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()