ICC Champions Trophy : टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? डिसेंबरनंतर जय शाह यांचे टेंशन वाढणार

Champions trophy 2025 : भारतीय संघ २००८ मध्ये शेवटचा पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यास भारतात होणाऱ्या महिला वर्ल्ड कप २०२५, आशिया चषक २०२५ आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेवर PCB बहिष्कार टाकू शकतात.
Jay Shah ICC voting
Jay Shah ICC votingesakal
Updated on

ICC Champions Trophy Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह हे डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) प्रमुखपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. पण, हा पदभार स्वीकारताच जय शाह यांचं टेंशन वाढणार असल्याचे चित्र आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीची पहिलीच स्पर्धा पाकिस्तानमध्ये नियोजित आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाला तिथे जाण्यास तयार करण्याची जबाबदारी जय शाह यांच्यांवर असणार आहे आणि त्यासाठी त्यांना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. जय शाह यांच्या नेत्वृत्वाखालील ICC ची ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे.

BCCI ने फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारवर सोपवला आहे. सध्यातरी सरकार भारतीय संघाला पाकिस्तानात खेळण्यासाठी जाण्याची परवानगी देण्याच्या कोणत्याच मूडमध्ये नाही. BCCI ने याबाबत केंद्र सरकारकडे कोणतीच विनंती केलेली नाही आणि त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) टेंशन वाढले आहे. पण, आता ICC चे प्रमुख म्हणून जय शाह यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jay Shah ICC voting
Jay Shah खिलाडूवृत्ती दाखवा; भारतीय संघ घेऊन पाकिस्तानात या! माजी खेळाडूची विनंती

'चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात सध्यातरी कोणतीच चर्चा नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही सरकारच्या निर्देशाचे पालन करणार आहोत. त्यामुळे पाकिस्तान दौऱ्यावर जायचं की नाही, हे आमच्या हातात नाही. आयसीसी प्रमुखपदावर बसल्यावर जय शाह यांच्यासाठीही ही आव्हानात्मक गोष्ट असणार आहे, परंतु त्यांना परिस्थिती माहित आहे आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण, आयसीसी प्रमुख म्हणून त्यांना गृहमंत्री अमित शाह आणि सरकारकडे परवानगीसाठी प्रयत्न करावे लागतील,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने InsideSport ला सांगितले.

Jay Shah ICC voting
Sumit Antil : लहानपणी वडील गेले, मोठेपणी पाय गेला; पण, एका पायावर तो जिद्दीने उभा राहिला अन् 'Golden Boy' बनला!

''भारतीय संघाशिवाय आयसीसीच्या स्पर्धा होणे अवघड आहेत, स्पर्धा व्हावी ही आमची इच्छा आहे. हे खेळासाठी चांगले आहे, परंतु आमची भूमिका ठाम आहे. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी व्हावी, अशी विनंती आम्ही आयसीसीला केली आहे,''असेही सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.