Shahid Afridi on Champions Trophy 2025: भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणार नाही, BCCI ने घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सैरभैर झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) स्पर्धेचे यजमानपद गतविजेत्या पाकिस्तानला दिलं, तेव्हाच वाद चिघळणार हे निश्चित होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले ताणलेले संबंध भारतीय संघाला शेजारच्या राष्ट्रात क्रिकेट खेळण्याची परवानगी केंद्र सरकार देणार नाही, हे निश्चित होतंच. तरीही पाकिस्ताला भाबडी आशा होती. मात्र, BCCI ने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आणि त्यावरून माजी कर्णधार शाहिद आफ्रीदी संतापलेला दिसतोय.