Rohit Sharma IPL 2025 Mumbai Indians : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा काल वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतंच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ उंचावला आणि आता रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी व जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याच्या तयारीत आहे. त्याला आणखी चषक जिंकायचे आहेत, हा निर्धार काल त्याने बोलून दाखवला आहे. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवला होता. महेंद्रसिंग धोनीनंतर ( २००७) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा रोहित दुसराच कर्णधार आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित व विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली. आता हे दोन्ही खेळाडू वन डे व कसोटी क्रिकेट खेळणार आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त रोहित खेळणार नसला तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो अजूनही खणखणीत फटकेबाजी करताना दिसणार आहे. पण, तो मुंबई इंडियन्सकडूनच खेळेल, याची खात्री चाहत्यांना वाटत नाही.
आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्याने रोहित नाराज झाल्याची चर्चा रंगलेली. त्यामुळेच तो MI ची साथ सोडून दुसऱ्या फ्रँचायझीकडे जाण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात रोहितने काल केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. ''मी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलो आहे, त्यामागे काहीतरी कारण असेल ना... मी आता थांबणार नाही, कारण एकदा का तुम्ही विजयाची व ट्रॉफी जिंकण्याची चव चाखता, तेव्हा तुम्ही थांबायचं नाव घेत नाही. आम्ही संघाला त्यासाठी प्रोत्साहित करत राहू. भविष्यात आणखी जेतेपद जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल,''असे रोहित म्हणाला.
रोहितचे हे विधान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी होते. पण, नेटिझन्सनी त्याचा संबंध आयपीएलशी जोडण्यास सुरूवात केली आहे.
रोहित पुढे म्हणाला,''आम्हाला पुढे काही आव्हानात्मक मालिका खेळायच्या आहेत. पण, आम्हाला थांबावचे नाही. एकदा तुम्ही यशाची पायरी चढता, तरर तुम्हाल आणखी यश मिळवत रहावेसे वाटते. हेच मला करायचे आहे आणि माझे संघ सहकारीही असाच विचार करत असतील, याची मला खात्री आहे.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.