Murder case filed against Shakib Al Hasan: बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाकिब क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या तापट वृत्तीमुळे टीकेचा धनी झाला आहे. आता तर त्याच्यावर थेट मर्डर केस दाखल झाली आहे. अष्टपैलू खेळाडूवर रफिक इल्साम या इसमाने हत्त्येच्या आरोपाखाली तक्रार दाखल केल्याचे वृत्त Dhaka Tribune ने दिले आहे.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात ७ ऑगस्टला इस्लाम यांचा ७ वर्षांचा मुलगा रुबेल याचा मृत्यु झाला. अदाबोर येथील रिंग रोडवर निघालेल्या रॅलीमध्ये रुबेल सहभागी झाली होता आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात रुबेलचा मृत्यु झाला. या प्रकरणात शाकिब, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजमुल हसन यांच्यासह एकूण १५६ जणांवर त्या व्यक्तिने तक्रार दाखल केली आहे.
ढाकाच्या अदाबोर पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल गेली आहे. यामध्ये बांगलादेशचा अभिनेता फर्दोस अहमदचाही समावेश आहे. शाकिब व फर्दोस हे दोघंही आवामी लीगचे माजी खासदार आहेत. सध्या शाकिब बांगलादेश संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर आहे. जिथे तो दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
शाकिबने ६७ कसोटींत ४५०५ धावा केल्या आणि २३७ विकेट्स घेतल्या आहेत. २४७ वन डे सामन्यांत ७५७० धावांसह त्याने ३१७ विकेट्स मिळवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तही शाकिबचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याच्या नावावर १२९ सामन्यांत २५५१ धावा व १४९ विकेट्स आहेत.
दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्या प्रमुखपदी माजी कर्णधार फारुक अहमदची नियुक्ती केली आहे. नझमुल हसन यांनी हे पद सोडले होते. फारुक १९९४ च्या आयसीसी ट्रॉफीत बांगलादेश संघाचा कर्णधार होता. १९९९ मद्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २००५ आणि २०१४ मध्ये तो राष्ट्रीय निवड समितीचा प्रमुखही होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.