Saina Nehwal on Vinesh Phogat disqualified: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी महिलांच्या ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु, बुधवारी सकाळी तिचे वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिचे पदकही हुकले. त्यामुळे सध्या तिला देशभरातून धीर दिला जात आहे.
अनेक सेलिब्रेटिंनीही तिच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. याच दरम्यान, भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने म्हटले आहे झालेल्या प्रकरणात विनेशचीही चूक होती. सायनाने विनेशबाबत वाईट वाटत असल्याचेही म्हटले आहे. परंतु, इतक्या मोठ्या स्तरावर अशी चूक होणे योग्य नसल्याचेही तिने म्हटले आहे.
सायनाने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, 'विनेश अनुभवी खेळाडू आहे. कुठेतरी विनेशच्या बाजूनेही चूक झाली आहे. तिनेही चूक मान्य करायला हवी. इतक्या मोठ्या सामन्यापूर्वी अशी चूक योग्य नाही. '
'तिला अनुभव आहे, तिला चूक आणि बरोबर माहित आहे. मला कुस्तीमधून बारकावे माहित नाहीत. मला माहित नाही की ऑलिम्पिकमध्ये असे कोणतेही अपील केले, तर त्याचा परिणाम काहीतरी महत्त्वपूर्ण होईल. तिला नियम माहित आहेत. मला माहित नाही की तिने काय चूक केली, तेही अगदी शेवटच्या दिवशी. मी तिला नेहमीच मेहनत करताना पाहिलंय. तिने नेहमीच १०० टक्के दिले आहे.'
ती पुढे म्हणाली, 'ती पहिलीच ऑलिम्पिक खेळतेय असं नाही. तिची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती. एक खेळाडू म्हणून तिला सर्व नियम माहिती आहेत. जर काही चूक झाली असेल, तर मला माहित नाही की ती कशी झाली. इतक्या मोठ्या स्तरावर मी अन्य कोणत्याही कुस्तीपटूकडून अशी गोष्ट ऐकलेली नाही की वजन जास्त असल्याने ते अपात्र ठरलेत.'
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विनेश ही तीन ऑलिम्पिक खेळणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तसेच ती अंतिम फेरीत पोहचणारीही पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.