Swapnil Kusale : दोघेही रेल्वेत टीसी! धोनीला गुरु मानून स्वप्नीलने साधला नेम, थाला फॉर रिझन!

Swapnil Kusale Wins Bronze Medal in Rifle Shooting 50m Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी 50 मीटर रायफल तीन पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला.
Olympic 2024 Swapnil Kusale MS Dhoni
Olympic 2024 Swapnil Kusale MS Dhonisakal
Updated on

Swapnil Kusale Paris Olympics 2024 Story : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी 50 मीटर रायफल तीन पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. कुसळेने एकूण 451.4 गुण मिळवत तिसरे स्थान पटकावत देशाला आणखी एक पदक मिळवून दिले.

Olympic 2024 Swapnil Kusale MS Dhoni
Olympic 2024: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं साधला नेम! जिंकले Bronze मेडल, खाशाबा जाधवांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरं ऑलिम्पिक पदक

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऑलिम्पिक पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच भारताला आतापर्यंत तिन्ही पदके केवळ नेमबाजीतच मिळाली आहेत, हा एक विक्रम आहे. मेडल जिंकल्यानंतर स्वप्नीलने सांगितले होते की, माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो आणि त्याच्याप्रमाणेच रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर आहे.

Olympic 2024 Swapnil Kusale MS Dhoni
चांगलं झालं की...! स्वप्नीलच्या पदकानंतर आजीची भारी प्रतिक्रिया, आई-वडिल यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

महाराष्ट्रातील कोल्हापुरातील कांबळवाडी गावात राहणारा 29 वर्षीय कुसळे 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत आहे. परंतु ऑलिम्पिक पदार्पणासाठी त्याला 12 वर्षे वाट पाहावी लागली. त्याने स्वतःला शांत ठेवण्यासाठी धोनीच्या कथेवर आधारित पिक्चर अनेक वेळा पाहिला.

स्वप्नील कुसाळे म्हणाला, मी नेमबाजीत कोणत्याही विशिष्ट खेळाडूचे मार्गदर्शन घेत नाही, पण इतर खेळांमध्ये धोनी हा माझा आवडता आहे. माझ्या खेळात शांत राहण्याची गरज आहे आणि तोही मैदानावर नेहमी शांत असायचा. तोही एकदा टीसी होता आणि मीही.

Olympic 2024 Swapnil Kusale MS Dhoni
Exclusive : ग्रामदेवतेला अभिषेक अन् घरात उत्साह! वडिलांनी सांगितली स्वप्नील कुसळेच्या जिद्दीची कहाणी

स्वप्नील कुसाळे हा मध्य रेल्वेत 2015 पासून कार्यरत आहेत. त्याचे वडील आणि भाऊ जिल्ह्याच्या शाळेत शिक्षक आहेत आणि आई गावची सरपंच आहे. त्याच्या कामगिरीबद्दल तो म्हणाला, आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मला शूटिंग आवडते आणि मला खूप आनंद आहे की मी इतके दिवस ते करू शकलो. मनु भाकर यांना पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. ती जिंकू शकली तर आपणही जिंकू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.