Shakib Al Hasan
Shakib Al Hasan esakal

Shakib Al Hasan ला बांगलादेशात जायची वाटतेय भीती; म्हणतो, हवीय सुरक्षेची हमी

SHAKIB AL HASAN ANNOUNCES TEST RETIREMENT - बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने कसोटी क्रिकेटमधून आज निवृत्ती जाहीर केली.
Published on

Shakib Al Hasan Test Retirement - बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मीरपूर येथे होणारी कसोटी लढत ही शेवटची असल्याचे आज त्याने जाहीर केले. पण, त्याला बांगलादेशमध्ये जाण्याची भीती वाटत आहे आणि त्यामुळे ग्रीन पार्क कसोटी ही त्याच्या कारकीर्दितील शेवटची कसोटी ठरू शकते.

शाकिब अल हसनने ७० कसोटी सामन्यांत ४६०० धावा केल्या आहेत आणि २४२ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. ट्वेंटी-२०त त्याने १२९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत २५५१ धावा केल्या आहेत आणि १४९ विकेट्स आहेत. वन डे क्रिकेटमध्ये २४७ सामन्यांत ७५७० धावा व ३१७ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

Shakib Al Hasan
Kanpur Test वर आणखी एक संकट! IND vs BAN दुसरी कसोटी न होण्याची शक्यता बळावली; वाचा नेमकं काय घडलं

बांगलादेशमधून बाहेर पडता येईल का?

''बांगलादेशी नागरिक असल्यामुळे भारतातून बांगलादेशमध्ये जाण्यास काही अडचण नाही, पण तिथे पोहोचल्यावर मला बाहेर पडता येईल की नाही हा माझा प्रश्न आहे. बांगलादेशातील परिस्थितीबद्दल मी माझ्या कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून जे काही ऐकत आहे त्यावरून मी थोडासा साशंक आहे,''असेही शाकिब म्हणाला.

Shakib Al Hasan
बांगलादेशचा माजी कर्णधार Shakib Al Hasan वर मर्डर केस; शेख हसिना यांचेही नाव, जाणून घ्या प्रकरण

अटक होण्याची भीती

''दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर बांगलादेश क्रिकेट संघटनेने मला परदेशात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग दिल्यास मी तेथे खेळेन, कारण तेथील परिस्थिती वेगळी आहे. तसे झाले नाही तर तिथे जाणे अवघड आहे,'' असे शाकिबने सांगितले.

शाकिब हा माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या पक्षाचा खासदार राहिला आहे. बांगलादेशमध्ये सध्या काळजीवाहू सरकार आहे आणि शाकिबवर या सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशात पोहोचताच त्यांना अटक होण्याची भीती आहे. साकिबची पत्नी अमेरिकन नागरिक आहे. अशा परिस्थितीत शाकिब भारतातून अमेरिकेलाही जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.