Paris Olympic: अवघ्या 14 वर्षांच्या धिनीधीचा मोठा पराक्रम! पॅरिस ऑलिम्पिकचं मिळवलंय तिकीट

Dhinidhi Desinghu: भारताची 14 वर्षीय जलतरणपटू धिनिधी देसिंघू आगामी पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Dhinidhi Desinghu
Dhinidhi DesinghuSakal
Updated on

Dhinidhi Desinghu: भारताची १४ वर्षीय जलतरणपटू धिनिधी देसिंघू ही आगामी पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. युनिव्हर्सिटी कोटामधून तिने प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवाची पात्रता मिळवली, हे विशेष.

तिच्यासोबत श्रीहरी नटराज यानेही याच कोट्यामधून ऑलिंपिकमधील प्रवेश निश्‍चित केला आहे. भारतीय जलतरण संघटनेकडून (एसएफआय) बुधवारी याबाबतची माहिती देण्यात आली.

Dhinidhi Desinghu
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघ जाहीर; अचूक लक्ष्य साधण्यासाठी नेमबाज सज्ज

श्रीहरी नटराज व धिनिधी देसिंघू या जलतरणपटूंना युनिव्हर्सिटी कोटा मिळण्यासाठी जागतिक ॲक्वेटीक संघाच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर आता दोघांचीही ऑलिंपिकवारी निश्‍चित झाली आहे.

याआधी श्रीहरी टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी झाला होता. त्यामुळे पॅरिस हे त्याचे दुसरे ऑलिंपिक असणार आहे. धिनिधी ही पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे.

Dhinidhi Desinghu
Paris Olympics : हरमनप्रीतकडे हॉकी संघाचे नेतृत्व; पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाची घोषणा

श्रीहरी नटराज हा ऑलिंपिकमध्ये १०० मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात ऑलिंपिकमध्ये आपली क्षमता दाखवेल, तसेच धिनिधी ही महिलांच्या २०० मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात सर्वस्व पणाला लावेल.

जागतिक ॲक्वेटीक गुणतालिकेत श्रीहरी याने ८४९ गुणांची कमाई करीत ऑलिंपिकमध्ये प्रवेश केला. धिनिधी हिने ७४९ गुणांसह बाजी मारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.