नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्राने ८९.४५ मीटरसह रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक गटात सुवर्ण व रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर भारताच्या भालाफेकपटूने ब्रुसेल्स येथे पार पडलेल्या डायमंड लीग २०२४ फायनल्समध्ये जेतेपदासाठी पूर्ण जोर लावला, परंतु नीरजला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. ०.०१ मीटर म्हणजेच १ सेंटीमीटरच्या फरकाने त्याला अव्वल राहिलेल्या पीटर्स अँडरसनशी बरोबरी करण्यात अपयश आले.