Neeraj Chopra पुन्हा एकदा 'Diamond' जिंकणार? तसं झाल्यास, एका रात्री मालामाल होणार

Diamond League final: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक रौप्यपदकानंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा ब्रुसेल इथे होणाऱ्या डायमंड लीगमधे इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.
Neeraj Chopra
Neeraj Chopraesakal
Updated on

Neeraj Chopra in Diamond League 2024 Final : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि पॅरिस रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. डायमंड लीग २०२४ चे अंतिम फेरीचे सामने १३ -१४ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. ब्रुसेल इथे हे सामने होणार असून स्पर्धेमध्ये एकूण ३२ खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना लाखोंची बक्षीसं मिळणार आहेत.

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. ग्रेनडाच्या ए पीटर्सने ८८.५४ मीटर भाला फेकत कांस्य पदक पटकावले. नीरजने या स्पर्धेत ८९.४५ मीटर भाला फेकून स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले होते. आता डायमंड लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन विजेतेपद पटकावण्याची नीरजकडे संधी आहे.

डायमंड लीग २०२४ मध्ये निरजसोबतच मराठमोळा धावपटू अविनाश साबळे देखील सहभागी झाला आहे. पॅरिसनंतर नीरजने विश्रांती न घेता पुन्हा सरावाला सुरुवात केली.

Neeraj Chopra
ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर वर्ल्ड कप नाही खेळणार; भारतीय संघ जाहीर

डायमंड लीग बक्षिस किंमत

नीरज चोप्राने विजेतेपद पटकावल्यास त्याला २५,१८,२३५ रुपयांचे बक्षीस मिळेल. उपविजेत्याला १०,०७,०४२ रुपयांचे बक्षीस मिळेल. आठव्या स्थानापर्यंत, खेळाडूंना प्रत्येकी ८३,९२५ रुपये मिळतील. अविनाश साबळेच्या स्टीपलचेस खेळामधील विजेत्यांनाही अशाच प्रकारे बक्षीस वितरण होईल. डायमंड लीगच्या अंतीम फेरीसोबतच जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश मिळवण्यावरही दोन्ही खेळाडूंनी लक्ष केंद्रित केले आहे.

आज रात्री १२ १२ वाजता नीरज चोप्राचा सामना असून जिओ सिनेमावर हा सामना पाहायला मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.