Paris Olympic 2024: काय सांगता! ७ महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिने 'तलवार' हाती घेतली अन् ऑलिम्पिकमध्ये लढली

7 Month pregnant fencer in Paris Olympic: ७ महिन्यांची गर्भवती असतानाही एक महिला तलवारबाज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आणि लढलीही.
7 Month pregnant fencer in Paris Olympic
7 Month pregnant fencer in Paris OlympicSakal
Updated on

Egyptian fencer Nada Hafez : ऑलिम्पिक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि त्या स्वप्नासाठी प्रत्येक खेळाडू संघर्ष करत असतो. अनेकदा परिस्थितीपुढेही हार न मानता इतरांसाठी प्रेरणा ठरतो.

अशीच एक घटना पॅरिस ऑलिम्पिकमध्येही घडली आहे. इजिप्तची महिला तलवारबाज नादा हाफिज चक्क ७ महिन्यांची गर्भवती असताना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आणि लढलीही.

नादाने तिच्या राऊंड ऑफ १६ मधील सामन्यानंतर सोशल मीडियावर ती ७ महिन्यांची गर्भवती असल्याचा खुलासा केला आहे. नादाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या तलवारबाजीमध्ये पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या एलिझाबेथ तार्ताकोवस्कीला १५-१३ फरकाने पराभूत केले होते.

7 Month pregnant fencer in Paris Olympic
Manu Bhaker Create History in Paris Olympic 2024 - शेवटचा नेम अन् विजयाचा जल्लोष! पाहा तो ऐतिहासिक क्षण Video

त्यानंतर तिचा राऊंड ऑफ १६ चा सामना दक्षिण कोरियाच्या जीऑन हायोंगविरुद्ध झाला, ज्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यातही तिने शेवटपर्यंत विजयासाठी झुंज दिली होती.

यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. तिने त्यात लिहिलंय, '७ महिन्यांची प्रेंग्नंट ऑलिम्पियन! पोडियमवर तुम्हाला दोन खेळाडू दिसले, पण प्रत्यक्षात तिथे तीन होते. एक मी होते, एक माझी प्रतिस्पर्झी आणि अजून या जगात न आलेले माझे लहान बाळ होते.'

'माझ्या बाळाचा आणि माझा या आव्हानाच समान वाटा आहे, मग तो शारिरीक असो किंवा भावनिक.'

7 Month pregnant fencer in Paris Olympic
Covid Strikes Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झाली 'कोरोना'ची एन्ट्री...! स्विमिंगमध्ये मेडल जिंकल्यानंतर खेळाडू पॉझिटिव्ह

तिने पुढे लिहिलं, 'गरोदरपणातील चढउतार कठीण असतो, पण जीवन आणि खेळ यांचा समतोल राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो. खेळ कठीण असला, तरी तो खेळणे मोलाचे होते. मी राऊंड ऑफ १६ मध्ये माझं स्थान निश्चित करू शकले, याचा मला अभिमान आहे, हे सांगण्यासाठीच मी ही पोस्ट लिहिली आहे.'

'मी भाग्यवान आहे की माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यानेच मी इतक्या दूरपर्यंत येऊ शकले. मी तीनवेळची ऑलिम्पियन असले, तरी यंदाचे ऑलिम्पिक खास होते, माझ्याबरोबर एक छोटा ऑलिम्पिन होता.'

हाफिज हिने यापूर्वी इजिप्तकडून २०१६ साली रिओ ऑलिम्पिक आणि २०२१ टोकियो ऑलिम्पिकही खेळले आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.