पॅरिस : पॅरिसमधील प्रसिद्ध सीन नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अखेर ऑलिंपिकमधील ट्रायथलॉन प्रकारातील जलतरणासाठी बुधवारी ट्रायथलीट्सनी पाण्यात सूर मारला. त्यामुळे अनिश्चिततेवर पडदा पडला.
बुधवारी सकाळी पॅरिसमध्ये पाऊस झाला. त्यानंतर महिलांच्या जलतरण प्रकारास आरंभ झाला. यासह ट्रायथलॉनमधील लांबणीवर पडलेले जलतरण आणि सीन नदीच्या पाण्याबाबत संभ्रमही दूर झाला. पॅरिसमधील प्रसिद्ध जलमार्गावरील पॉन अलेक्झांडर ३ या पुलावर खेळाडू जमले. या वेळी हलकासा पाऊस सुरू होता. जलतरणास सुरुवात करण्यापूर्वी काही ट्रायथलीट्सनी आपले स्वीम गॉगल सीन नदीच्या पाण्यात बुडवून नंतर वापरले.
सीन नदीत ट्रायथलॉनमधील जलतरण घेण्याचा निर्णय पॅरिस शहर, ऑलिंपिक्स आयोजक व खेळाडूंच्या दृष्टीने विजय मानला जातो. दीर्घ पल्ल्याच्या प्रदूषित सीन नदीच्या स्वच्छतेसाठी १.४ अब्ज युरोंचा (१.५ अब्ज डॉलर्स) महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली होती.
पॅरिस ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्यात जोरदार पाऊस झाला होता. शनिवारीही बहुतांश वेळ पाऊस झाला. त्याचा थेट परिणाम सीन नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर झाला. रविवारपासून आयोजकांना शर्यती रद्द करणे किंवा लांबणीवर टाकण्याची घोषणा करावी लागली होती.
बुधवारी पहाटे ताज्या चाचण्यांमध्ये पाण्याच्या गुणवत्ता मानकांचे पालन दिसून आले, असे आयोजकांनी सांगितले. पुरुष गटातील जलतरण शर्यत नदीतील बॅक्टेरियाच्या वाढीव प्रमाणामुळे मंगळवारऐवजी बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली, या कालावधीत महिलांची शर्यतीतही नियोजित होती. स्पर्धकांना नदीच्या पात्राची ओळख करून देणाऱ्या चाचणी शर्यती यापूर्वी रविवारी आणि सोमवारी बॅक्टेरियाच्या वाढीव प्रमाणामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.
सीन नदीत ८ आणि ९ ऑगस्टला मॅरेथॉन जलतरण शर्यत नियोजित आहे. गरज भासल्यास या शर्यती दुसऱ्या ठिकाणी ग्रेटर पॅरिस विभागातील व्हेयर-स्यूर-मार्न नॉटिकल स्टेडियमवर हलविण्यात येतील. या ठिकाणी सध्या रोईंग व कॅनोईंग स्पर्धा सुरू असून १५,००० प्रेक्षकांची क्षमता आहे. सीन नदीतील पाणी पोहण्यास योग्य बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.