Paris Olympic 2024 Medal Tally- जपान अन् चीन यांच्यातील शर्यतीत फ्रान्सची एन्ट्री; भारत कितव्या स्थानी?

Paris Olympic 2024 Medal Tally - नेमबाज मनु भाकरने भारताचे पदकाचे खाते उघडले.. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन पदकं थोडक्यात हुकली, पण आज मनुला इतिहास घडवण्याची आहे संधी.
Paris Olympic 2024 medal tally
Paris Olympic 2024 medal tallysakal
Updated on

Paris Olympic 2024 medal tally know where is India - ऑलिम्पिक स्पर्धेच्या पदक तालिकेत रोज चढ उतार पाहायला मिळत आहे... चीनने त्यांची मक्तेदारी कायम राखली असली तरी जपानकडून त्यांना कडवी टक्कर मिळताना दिसतेय... पॅरिसमध्ये पहिले गोल्ड जिंकण्याचा मान चीननेच पटकावला होता. पण, आता चीन व जपान यांच्या शर्यतीत यजमान फ्रान्सने मुसंडी मारलेली पाहायला मिळतेय.. या शर्यतीत ११७ खेळाडूंसह पॅरिसमध्ये दाखल झालेला भारत सध्या कुठे आहे, हे जाणून घेऊया..

२७ जुलै रोजी नेमबाज मनु भाकर हिने भारताचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील खात उघडले. त्यानंतर काल रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता या नेमबाजांना पदक जिंकण्याची संधी होती, परंतु अगदी थोडक्यात त्यांचे पदक हुकले. रमिता ०.३ गुणांच्या फकराने पदक शर्यतीतून बाहेर पडली आणि ७व्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे अर्जुनला चौथ्या क्रमांकासह स्पर्धेतून माघारी पडावे लागले. अगदी थोडक्यात त्याचे कांस्यपदक हुकले.

Paris Olympic 2024 medal tally
मनू भाकरच्या X अकाऊंटवर Elon Muskने केला बदल; पण का?

पदक तालिकेवर लक्ष टाकल्यास सध्या जपान ६ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्यपदक अशी एकूण १२ पदकांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यापेक्षा फ्रान्सने जास्त म्हणजेच १६ पदकं जिंकली आहेत, परंतु त्यांची सुवर्णपदकाची संख्या ५ असल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय त्यांनी ८ रौप्य व ३ कांस्यपदकं नावावर केली आहेत. चीन ५ सुवर्ण, ५ रौप्य व २ कांस्य असे १२ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( ५ सुवर्ण व ४ रौप्य) आणि दक्षिण कोरिया ( ५ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्य) हे टॉप फाईव्ह मध्ये आहेत.

Paris Olympic 2024 medal tally
Paris Olympic 2024 medal tallysakal

अमेरिकेने ३ सुवर्ण, ८ रौप्य व ९ कांस्य अशी एकूण सर्वाधिक २० पदकं जिंकली आहेत. ग्रेट ब्रिटन, इटली, कॅनडा, हाँग काँग हे प्रत्येकी २ सुवर्णपदक जिंकून टॉप टेनमध्ये जागा पकडून आहेत. या यादीत भारतीय संघ १ कांस्यपदकासह २६व्या स्थानी घसरला आहे. काल भारत २२व्या क्रमांकावर होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.