Vinesh Phogat in Paris Olympic: 'ज़माना झुकता है...!', बहिणीसाठी गीता फोगाटची स्पेशल पोस्ट; बजरंग पुनियाकडूनही विशेष कौतुक

Indian Wrestler Vinesh Phogat in Semi-Final: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटने चॅम्पियन्स खेळाडूंना पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यानंतर तिचे सध्या देशभरातून कौतुक होत आहे.
Vinesh Phogat | Paris Olympic 2024
Vinesh Phogat | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Indian Wrestler Vinesh Phogat in Semi-Final at Paris Olympic 2024: भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे. यंदा ५० किलो वजनी गटात लढण्यासाठी उतरलेल्या विनेशसमोरचे आव्हान सोपे नव्हते.

तिच्या समोरील ड्रॉ कठीण होता. पण असं असलं तरी २९ वर्षीय विनेशने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. याबाबत तिचं सध्या कौतुक होत आहे. विनेशची चुलत बहीण गीता फोगाटनेही तिचं कौतुक केलं असून गेल्यावर्षी तिनं कशाप्रकारे देशात लढाई केली होती, याचीही अप्रत्यक्षरित्या आठवण करून दिली आहे.

Vinesh Phogat | Paris Olympic 2024
Paris Olympic 2024: Neeraj Chopra अव्वलच...पण फायनलमध्ये असणार 'या' ११ खेळाडूंचं आव्हान, पाकिस्तानी खेळाडूचाही समावेश

विनेशचा पहिलाच सामना टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती आणि गेल्या १४ वर्षांत केवळ तीन सामने गमावणाऱ्या जपानच्या युई सुसाकीविरुद्ध होता. या सामन्यात जपानी खेळाडूनं २-० आघाडी घेतलेली. पण शेवटच्या काही क्षणात विनेशने बाजी पालटली आणि ३-२ असा सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

उपांत्यपूर्व फेरीतही युक्रेनच्या ओक्साना लिव्हाचचे आव्हान होते. हे आव्हानही कठीण होते. पण यावेळीही विनेशने ७-५ अशा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

तिच्या या यशानंतर सध्या भारतभरातून कौतुक होत आहे. गीता फोगटने तिचे कौतुक करताना ट्वीट कले की 'ज़माना झुकता है, बस झुकाने का जुनून होना चाहिए'. ही पोस्ट करताना गीताने विनेशचे सामन्यातील फोटो, तसेच गेल्यावर्षी बृजभूषण सिंगविरुद्ध केलेल्या अंदोलनातील फोटोही शेअर केले आहेत.

Vinesh Phogat | Paris Olympic 2024
Paris Olympic 2024 Vinesh Phogat: शाब्बास विनेश फोगाट! टोकियोतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला केले चीतपट

याशिवाय भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही विनेशचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले, 'विनेशच्या विजयावर कशी प्रतिक्रिया देऊ कळतच नाहीये. पहिल्यांदाच असं होतंय की आनंदीही आहे आणि डोळ्यात पाणीही आहे. संपूर्ण भारत या पदकाची वाट पाहत आहे. प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.'

'असं वाटत आहे की विनेश एकटी नाही, तर असं वाटत आहे संपूर्ण देशातील महिला लढत आहेत. विनेश, तू खरंच पराक्रम करण्यासाठी जन्मली आहेस. इतक्या अडचणींनंतरही तू आपल्या ध्येय्यवरील लक्ष्य विचलित केलेलं नाहीयेस. आमच्या याच प्रार्थना आहे की भारतात सुवर्णपदक यावं.'

बजरंग पुनिया हा देखील विनेशसह आंदोलनात सहभागी झालेला होता. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह काही भारतीय कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंग विरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्याचसाठी अनेक दिवस कुस्तीपटूंनी आंदोलनही केले होते. यानंतर बृजभूषणवरील आरोपही दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं निश्चित केले होते.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()