Paris Olympic 2024: इकडे हॉकी संघ जिंकला, पण दुसरीकडे लवलिनाचं पदक थोडक्यात हुकलं; बॉक्सिंगमधील भारताचं आव्हानही संपलं

Lovlina Borgohain Boxing: लवलिना बोर्गोहेनला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या अव्वल मानांकित खेळाडूविरुद्ध पराभूत व्हावं लागल्याने भारताचं बॉक्सिंगमधील आव्हानही पदकाविना संपलं.
Lovlina Borgohain | Paris Olympic 2024
Lovlina Borgohain | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Lovlina Borgohain lost in Quarter-Final: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत रविवारी भारताचे अनेक महत्त्वाचे सामने होत आहेत.

भारताच्या हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटन संघाला शूटआऊटमध्ये पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. पण याचदरम्यान बॉक्सिंगमध्ये भारताच्या लवलिना बोर्गोहेन हिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चीनच्या ली क्विएनविरुद्ध झाला.

लवलिनाला महिलांच्या ७५ किलो वजनी गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या सामन्यात ४-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचं पदकही हुकलं.

Lovlina Borgohain | Paris Olympic 2024
India at Paris Olympic 2024 Hockey: भारताकडून ग्रेट ब्रिटनचे 'Shoot Out'! उपांत्य फेरीत थाटात पोहचलो

तिने जर हा सामना जिंकला असता, तर तिचं पदक पक्कं झालं असतं. मात्र आता तिला अव्वल मानांकीत ली क्विएनने पराभूत केल्याने पदकाला मुकावे लागले आहे.

ली क्विएनने सुरुवातीपासूनच लवलिनाला या सामन्यात वरचढ होण्याची संधी दिली नव्हती. तरी लवलिनाने शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र तिला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, तिच्या पराभवासह भारताचं बॉक्सिंगमधील आव्हानही संपले आहे.

Lovlina Borgohain | Paris Olympic 2024
Paris Olympic 2024: भारतासाठी 'सुपर संडे'! लक्ष्य सेन, लवलिना मेडल पक्कं करणार अन् हॉकी संघ सेमीफायनल गाठणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

लवलिनाने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यामुळे यंदा तिला तिचं दुसरं पदक जिंकण्याची संधी होती.

लवलिनापूर्वी शनिवारी भारताच्या निशांत देव यालाही ७१ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे त्यालाही पदकाला मुकावे लागले.

तसेच याआधी भारताची स्टार बॉक्सर निखत झरिन हिलाही उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला होता, तर अमित पांघल, प्रीती पवार आणि जास्मिन लाम्बोरिया यांनाही पदक जिंकण्यात अपयश आले आहे.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.