Paris Olympic 2024 Hockey: अमित रोहिदासवर बंदी, मग सेमीफायनलमध्ये भारतीय संघ १० की ११ खेळाडूंसह उतरणार मैदानात?

India's Amit Rohidas Red Card: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर एका सामन्याची बंदी लागली आहे.
Amit Rohidas | India Hockey Team | Paris Olympic 2024
Amit Rohidas | India Hockey Team | Paris Olympic 2024Sakal
Updated on

India Hockey Player Amit Rohidas banned for one match: भारतीय हॉकी संघाने रविवारी (४ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत ग्रेट ब्रिटन संघाला उपांत्यपूर्व फेरीत शूट आऊटमध्ये ४-२ अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

मात्र, उपांत्यपूर्व फेरीत एक नाट्यपूर्ण घटना घडली. भारताच्या अमित रोहिदासला १७ व्या मिनिटालाच रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे उर्वरित सामन्यात भारतीय संघ १० खेळाडूंसह खेळला.

दरम्यान, आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने घोषित केले की अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे तो उपांत्य सामन्यात खेळू शकणार नाही. तथापि, भारतीय हॉकी असोसिएशननेही या निर्णयाविरुद्ध अपील केले आहेत. दरम्यान आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन सोमवारी यावर अंतिम निर्णय देईल.

Amit Rohidas | India Hockey Team | Paris Olympic 2024
India at Paris Olympic 2024 Hockey Live : भारताने हर'मन' जिंकले! १९७२ नंतर ऑस्ट्रेलियाला नमवून रचला इतिहास

दरम्यान, जर अमित रोहिदासवरील बंदी कायम राहिली, तरी भारतीय संघ उपांत्य सामन्यात ११ खेळाडूंसह खेळू शकतो. कारण जरी त्याच्यावर बंदी लागली, तरी भारतीय संघ उपांत्य सामन्यात १६ ऐवजी १५ जणांच्या संघासह उतरेल. यातील ११ खेळाडू सामन्यात खेळू शकतात.

नक्की काय झालं होतं?

या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नव्हता. त्यानंतर दुसरा क्वार्टर चालू झालेला असतानाच सामन्याच्या १७ व्या मिनिटाला भारताचा डिफेंडर अमित रोहिदास बॉलसह धावत होता. यावेळी मागून ब्रिटनचा कॅल्नन त्याला मागून आव्हान देत होता.

यावेळी अमितची हॉकी स्टीक विचित्र पोझिशनमध्ये होती, त्यामुळे त्याने बॉलला मारण्यासाठी स्टीक उचलल्यानंतर ती कॅल्ननच्या डोक्याला लागली आणि त्यामुळे कॅल्ननला दुखापत झाली.

जरी अमितकडून ही कृती हेतूपूर्वक झाली नसली तरी हॉकीमध्ये खेळाडूला त्यांची स्टीक दुसऱ्या खेळाडूंच्या डोक्याच्या वर नेता येत नाही आणि धोकादायक पद्धतीने वापरता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे त्याला रेड कार्ड देण्यात आले. यामुळे त्याच्यावर पुढच्या सामन्यात बंदीची कारवाईही झाली.

Amit Rohidas | India Hockey Team | Paris Olympic 2024
India at Paris Olympic 2024 Hockey: भारताकडून ग्रेट ब्रिटनचे 'Shoot Out'! उपांत्य फेरीत थाटात पोहचलो

भारताचा शानदार विजय

या सामन्यातून रोहिदास बाहेर गेल्यानंतरही भारतीय संघाने ब्रिटनला टक्कर दिली. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने २२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. पण त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टनने २७ व्या मिनिटाला मैदानी गोल करत बरोबरी साधली.

नंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत १-१ अशी बरोबरी राहिली. त्यामुळे शूट आऊटमध्ये निकाल लागला.

शूट आऊटमध्ये भारताकडून हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि राज कुमार पाल यांनी गोल केले. ब्रिटनकडून जेम्स अल्बरी आणि झॅक वेलास यांनी गोल केले. पण कॉनर विलियम्सन आणि फिलिप रॉपर यांना गोल करता आले नाहीत. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.