India in Paris Olympic 2024 Day 10 results:पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. अगदी जवळ असलेल्या मेडलच्या संधी भारताने गमावल्या. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन कांस्य पदकाच्या सामन्यात पराभूत झाला, तर नेमबाजीतही भारताचं चौथं पदक हुकलं. एकूणच भारतासाठी हा दिवस कसा राहिला जाणून घेऊ.
सोमवारी नेमबाजीतील स्कीट प्रकारात मिश्र गटात भारताच्या महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. कांस्य पदकाच्या लढतीत महेश्वरी आणि अनंतजीत यांना चीनची जोडी यिटींग जियांग आणि जियानलीन ल्यू यांनी ४३-४४ अशा फरकाने पराभूत केलं. यासह भारताची नेमबाजीतील मोहिमही संपली.
टेबल टेनिसमध्ये सांघिक गटात सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा सामना रोमानियाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने ३-२ अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात दुहेरीत अर्चना कामथ-श्रीजा अकुला यांनी एलिथाबेथ समारा-एडिना डिएकोनू यांना पराभूत केलं.
त्यानंतर मनिका बत्राने बेरनाडेट एसझॉक्सला पराभूत केलं. पण यानंतर श्रीजाला एलिथाबेथ समाराने पराभूत केले. अर्चनाला एसझॉक्सने पराभूत केले. त्यामुळे २-२ अशी बरोबरी झाली. त्यानंतर मनिकाने डिएकोनूला पराभूत केले. त्यामुळे भारताचा विजय मिळवला.
महिला ४०० मीटर प्राथमिक फेरीत हिट ५ मध्ये किरण पहल ९ व्या क्रमांकांवर राहिली. त्यामुळे आता तिला रिपेजेच राऊंडमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
याशिवाय पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात अविनाश साबळेने दुसऱ्या हिटमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.
भारताचा लक्ष्य सेन कांस्य पदकाच्या सामन्यात मलेशियाच्या झी जिया ली याच्याविरुद्ध २१-१३, १६-२१, ११-२१ अशा फरकाने पराभूत झाला. त्यामुळे त्याला कांस्य पदकापासून दूर रहावे लागले.
कुस्तीमध्ये महिलांच्या ६८ किलो वजनी गटात भारताची निशा दहीया सहभागी झाली होती. तिने उपउपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या टेटियाना सोव्हा हिचा ६-४ अशा फरकाने पराभव केला होता.
त्यानंतर ती उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या पाक सोल गमविरुद्ध खेळत असताना दुखापतग्रस्त झाली. तिचं कोपर निखळलं. त्यामुळे तिला रडूही आवरता आलं नाही. पण असं असलं तरी तिनं मैदान सोडलं नाही. तिला १०-८ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.