Paris Olympic 2024: १०० ग्रॅम ते १ किलो! विनेशनंतर मिराबाई चानूला पदकाची हुलकावणी; १२व्या दिवशी बारा वाजले

Paris Olympic 2024 Day 12 Result: बुधवारचा दिवस भारतासाठी अत्यंत निराशाजनक राहिला. विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले, तर मिराबाई चानूलाही पदक जिंकण्यात अपयश आले.
Paris Olympic Day 12
Paris Olympic Day 12Sakal
Updated on

India in Paris Olympic 2024 Day 12 results: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी बुधवारचा दिवस एक निराशाजनक वृत्त घेऊन आला, पण शेवटही निराशाजनकच झाला. भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला तिचे वजन तिच्या वजनी गटापेक्षा १०० ग्रॅमने जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले.

खरंतर तिने मंगळवारी रात्री अंतिम फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले होते. मात्र तिला आता अपात्र ठरवल्यानंतर तिचे पदकही हुकले आहे. त्यामुळे दिवसभर देशभरातून निराशा व्यक्त होत होती. त्यानंतर मिराबाई चानूही सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकली नाही.

Paris Olympic Day 12
Paris Olympic 2024: विनेशनं मेडल पक्कं केलं, पण हॉकी संघाचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं, कसा होता ११ वा दिवस?

ऍथलेटिक्स

मॅरेथॉन रेस वॉक मिक्स रिले प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व प्रियांका गोस्वामी आणि सुरज पन्वर करत होते. मात्र ते शर्यत पूर्ण करू शकले नाहीत.

त्यानंतर पुरुषांच्या उंच उडीची पात्रता फेरी बुधवारी झाली. यामध्ये दुसऱ्या हिटमध्ये सर्वेश कुशारेन २.१५ मीटर उंच उडी मारली. मात्र तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

महिला १०० हर्डल्स प्राथमिक फेरीत भारताची ज्योती याराजी चौथ्या हिटमध्ये होती. पण ती यामध्ये ७ व्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे आता ती रेपेशॉमध्ये सहभागी होईल.

महिलांची भालाफेकची पात्रता फेरीही बुधवारी झाली. यामध्ये भारताची अनू राणी २९ व्या क्रमांकावर राहिली. तिला ५५.८१ मीटरवर भाला फेकता आला.

पुरुष तिहेरी उडीच्या पात्रता फेरीही बुझवारी झाल्या. यामध्ये भारताचा अब्दुल्ला अबुबकर २१ व्या क्रमांकावर राहिला, तर प्रवीण चित्रावेल २७ व्या क्रमांकावर राहिला.

पुरुष ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे ११ व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्याचेही आव्हान संपले. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये अंतिम फेरीत पोहचणारा तो पहिलाच भारतीय आहे.

टेबल टेनिस

टेबल टेनिसमध्ये सांघिक गटात भारतीय महिला संघाचा सामना उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीविरुद्ध होता. परंतु, श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला ३-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये भारताकडून केवळ अर्चनाला तिचा एकेरीचा सामना जिंकता आला. त्यामुळे आता भारताचे टेबल टेनिसमधून आव्हानही संपले.

कुस्ती

विनेश फोगट अपात्र ठरल्याने तिला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच बुधवारी अंतिम पांघलही ५३ किलो वजनी गटात खेळण्यासाठी उतरली होती. मात्र तिला उपउपांत्यपूर्व फेरीत तुर्कीच्या झेयनेप येतगीलने १०-० असं पराभूत केलं. त्यामुळे तिला पुढच्या फेरीतही पोहचता आलं नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विनेशने आता तिच्या अपात्रतेविरोधात अपील केले असून रौप्यपदक मिळावे, यासाठी विनंती केली आहे.

वेटलिफ्टिंग

महिला ४९ किलो वजनी गटात भारताची मिराबाई चानू उतरली होती. तिने स्नॅच प्रकारात ८८ किलो आणि जर्क प्रकारात १११ किलो असे मिळून १९९ किलो वजन उचलले. पण ती चौथ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे तिला पदकापासून थोडक्यात मुकावे लागले.

गोल्फ

गोल्फमध्ये महिला पहिली फेरी सुरू झाली आहे. यामध्ये पहिल्या फेरीनंतर भारताची दिक्षा डागर वन-अंडर ७१ स्कोअर केला. ती अन्य ५ खेळाडूंसह सातव्या क्रमांकावर राहिली. तसेच आदिती अशोक ७२ पारच्या स्कोअरसह T13 व्या क्रमांकावर राहिली.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.