नवी दिल्ली- भारताचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे. शुक्रवारी कुस्तीगीर रितीका हुडा हिच्या अपयशानंतर आता अधिक पदकं भारताच्या वाट्याला येण्याची शक्यता मावळली आहे. भारताला या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकं जिंकता आलेलं नाही. भारताची यावेळची कामगिरी टोक्यो ऑलिम्पिकपेक्षा खराब राहिली आहे. भारताच्या पदरात या ऑलम्पिकमध्ये एकूण सहा पदकं पडली आहेत. यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकं आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकची रविवारी सांगता होईल. यावेळी समारोपाचा कार्यक्रम होईल. सुवर्ण पदकाच्या अभावासोबत भारत पदक तालिकेमध्ये देशांच्या यादीत ७० व्या स्थानी आहे. शिवाय काही शेवटच्या खेळानंतर हे स्थान आणखी घसरण्याची शक्यता आहे. भारतीय खेळाडूंनी २०२० च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी भारताच्या वाट्याला एकूण सात पदकं आली होती. यात सुवर्ण पदकाचा देखील समावेश होता.
२२ वर्षीय मनू भाकरने शुटिंगमध्ये भारताला दोन पदकं मिळवून दिली आहेत. तर निरज चोप्राने भालाफेकध्ये रौप्य पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदकं मिळवलं. लक्ष सेन आणि अर्जून बाबुटा हे कांस्य पदक जिंकण्याच्या फार जवळ होते, पण त्यांना अपयश आले.
भारताच्या हॉकी संघानं कमाल केली. हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पकदकावर आपलं नाव कोरलं. १९७२ नंतर अशी पहिलीच वेळ होती. अमन सेहरावत याने कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकत भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू असण्याचा मान मिळवला.
1.मनू भाकर- कांस्य ( वूमन एअर १०m पिस्टल)
2. मनू भाकर आणि सरबजित सिंग - कांस्य( एअर १०m पिस्टल टीम)
3.स्वप्नील कुसळे - कांस्य (मेन्स ५०m रायफल ३ पोझिशन)
4.हॉकी टीम- कांस्य (मेन्स हॉकी फिल्ड टीम)
5. अमन सेहरावत- कांस्य ( कुस्ती ५७ किलो वजनी गट)
6.निरज चोप्रा- रौप्य ( भाला फेक)
याशिवाय विनेश फोगाट हिने ५० किलो वजनी गटात कुस्तीमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. पण, तिचे वजन १०० ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेशने याविरोधात ऑलिम्पिक समितीकडे अपिल केले आहे. याचा निर्णय १३ ऑगस्ट रोजी येण्याची शक्यता आहे. निर्णय सकारात्मक आल्यास तिला रौप्य पदकं मिळू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.