Neeraj Chopra Final Schedule: गोल्डन बॉय पॅरिसमध्येही तिरंगा फडकवण्यास सज्ज... जाणून घ्या कधी होणार फायनल?

Neeraj Chopra in Javelin throw final Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा भालाफेकीची फायनल कधी खेळणार? जाणून घ्या
Neeraj Chopra | Paris Olympic 2024
Neeraj Chopra | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Neeraj Chopra Javelin Throw Final at Paris Olympic 2024 Schedule: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत मंगळवारी अनेक भारतीयांचे लक्ष भालाफेकीच्या पात्रता फेरीकडे होते.

या पात्रता फेरीत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि किशोर जेना उतरणार होते. दरम्यान, नीरजने अपेक्षेनुसार अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. मात्र किशोर जेनाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आलं आहे.

नीरजने या पात्रता फेरीत बी ग्रुपमध्ये खेळताना पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर अंतरावर भाला फेकला. यासह त्याने अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. नीरजची यंदाच्या हंगामातील हे सर्वोत्तम भाला फेकीचे अंतरही ठरले आहे. नीरज यंदा त्याचं सुवर्णपदक राखण्यासाठी अंतिम फेरीत भालाफेक करताना दिसणार आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

Neeraj Chopra | Paris Olympic 2024
भावा तुझ्यासाठी काहीपण! Neeraj Chopraसाठी पठ्ठ्याने 30 देशात केली २२ हजार किलोमिटरची 'सायकल' वारी

पात्रता फेरीतून ८४ मीटरच्या पुढे भालाफेक करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्याव्यतिरिक्त सर्वोत्तम १२ खेळाडूंमध्ये येणाऱ्यांना अंतिम फेरीत स्थान दिले जाते.

किशोर जेना अपयशी

भारताचा किशोर जेना ए ग्रुपमध्ये होता. त्याने पात्रता फेरीत पहिल्या फेरीत त्याचा सर्वोत्तम ८०.७३ मीटर भाला फेकला. त्यामुळे तो या ग्रुपमध्येच ९ व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्याचं या स्पर्धेतील आव्हानही संपले आहे. त्याचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला, तर तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८०.२१ मीटर भाला फेकला होता.

Neeraj Chopra | Paris Olympic 2024
Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'गोल्‍ड मेडल' जिंकणाऱ्या खेळाडूला आली गार्डनमध्ये झोपण्याची वेळ, काय घडलं नेमकं ?

अंतिम फेरी कधी होणार?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्समधील अनेक क्रीडा प्रकार सुरु आहेत. त्यामध्ये आता पुरुषांच्या भालाफेकीची अंतिम फेरी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या अंतिम फेरीला ८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता सुरुवात होणार आहे.

आता या अंतिम फेरीतही नीरजकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. तो अंतिम फेरीत दुसऱ्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घालत पॅरिसमध्ये तिरंगा फडकावणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नीरजला यंदा झेक प्रजासत्ताकच्या याकुब वाडलेच, जर्मनीचा ज्युलियन वेबर, पाकिस्तानचा अर्शद नदीम, ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांचे आव्हान असणार आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.