PM Modi on Vinesh Phogat: विनेश फोगाटला रौप्यपदक नाकारले; पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच व्यक्त झाले, म्हणाले...

PM Narendra Modi's praise for Vinesh Phogat: विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दाखवलेल्या कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतुक केले आहे.
Narendra Modi | Vinesh Phogat
Narendra Modi | Vinesh PhogatSakal
Updated on

PM Narendra Modi on Vinesh Phogat Performance: भारताची २९ वर्षीय कुस्तीपटू विनेश फोगट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दाखवलेल्या कामगिरीबद्दल आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतुक केले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. या प्रकारात तिच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिने तीन बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तीन अंतिम फेरीत प्रवेश करणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटूही ठरली होती. मात्र तिचा हा प्रवास कडू आठवणींसह संपला.

अंतिम सामन्याच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅमने अधिक भरलं. त्यामुळे नियमानुसार ऑलिम्पिक समितीने तिला अपात्र ठरवत सर्वात शेवटच्या स्थानावर ठेवलं. याशिवाय तिने उपांत्य फेरीत पराभूत केलेल्या खेळाडूला अंतिम फेरीत स्थान देण्यात आलं.

Narendra Modi | Vinesh Phogat
Vinesh Phogat: 'निर्णयाला उशीर झाल्यावर आपण सर्वच वैतागतो, पण...', विनेशचा निकाल लांबणीवर पडल्यानंतर अभिनव बिंद्राची पोस्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.