Paris Olympic 2024: महाराष्ट्राच्या लेकाची शान! स्वप्नील कुसळे अचूक 'लक्ष्य' भेदून फायनलमध्ये, पदकासाठी खेळणार

Shooter Swapnil Kusale Enters in Final Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताचा नेमबाज स्वप्नील कुसळेने ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Swapnil Kusale
Swapnil KusaleSakal
Updated on

Swapnil Kusale into the final in 50m Rifle 3 Positions at Paris Olympic: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी म्हणजे बुधवारी नेमबाजीत पुरुषांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारातील क्वालिफायर्स पार पडले.

या प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, त्यामुळे आता त्यानेही पदकांच्या आशा उंचावल्या आहेत.

क्वालिफायर्समध्ये स्वप्नील ७ व्या क्रमांकावर राहिला. त्याने ५९० गुण मिळवले. अखेरच्या क्षणी अंतिम फेरीत जाण्यासाठी त्याला फ्रान्सच्या रोमेन ऑफ्रेर आणि झेक प्रजासत्ताकच्या जिरी प्रिरात्स्की आणि पीटर निम्बुरस्की यांच्याकडून आव्हान मिळालं होतं.

मात्र त्याने जिरी शेवटच्या क्षणी पिछाडीवर पडला आणि आठव्या क्रमांकावर आला. त्यामुळे स्वप्नीलचं सातवं स्थान पक्कं झालं. दरम्यान जिरीचेही ५९० गुण झाले.

Swapnil Kusale
Paris Olympic 2024 Badminton: भारताचे चिराग-सात्विक ऑन 'टॉप', मात्र अश्विनी-तनिषाचं आव्हान संपुष्टात

याच प्रकारात भारताचा ऐश्वर्य प्राताप सिंग तोमर देखील सहभागी झाला होता. मात्र त्याला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. क्वालिफायर्समधून केवळ ८ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

ऐश्वर्य प्रतापनेही सुरुवात चांगली केली होती. तो पहिल्या ८ मध्येही सातत्याने होता. मात्र शेवटच्या स्टेजला तो पिछाडीवर पडला. विशेष म्हणजे ७ आणि ८ क्रमांकावर राहिलेल्या स्वप्नील आणि जिरीपेक्षा तो फक्त एका गुणाने मागे राहिला. ऐश्वर्य प्रतापचे ५८९ गुण होते. त्यामुळे तो ११ व्या क्रमांकावर राहिला.

Swapnil Kusale
Paris Olympic 2024: काय सांगता! ७ महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिने 'तलवार' हाती घेतली अन् ऑलिम्पिकमध्ये लढली

आता पुरुषांची ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारातील अंतिम फेरी १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. आता या प्रकारातून स्वप्नील भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील तिसरं पदक मिळवून देणार का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात नेमबाजीतून दोन पदके आली आहे. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले. तसेच मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिळून मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.