Paris Olympic 2024: पॅरिसमध्ये डौलाने फडकला तिरंगा! पाहा मनु भाकरमुळे भारतीयांचा गौरव झालेला क्षण

Manu Bhaker Won Bronze Medal in Paris Olympic: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जेव्हा मनू भाकरला पदक देण्यात आले, त्या अभिमानाच्या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Manu Bhaker
Manu BhakerSakal
Updated on

Manu Bhaker Won Bronze Medal in Paris Olympic: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत रविवार भारतासाठी शानदार ठरला. २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने भारताच्या पदकांचं खातं उघडलं. तिने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

या प्रकारात पहिल्या दोन क्रमांकावर दक्षिण कोरियाचे खेळाडू राहिले. ओ ये जिन हिने सुवर्णपदकावर नाव कोरले, तर किम येजी हिने रौप्य पदक जिंकले.

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या किंवा संघाच्या देशाचा झेंडा पदक वितरण समारंभावेळी फडकवला जातो. तसेच सुवर्णपदक विजेत्याच्या देशाचे राष्ट्रगीतही वाजवले जाते.

त्यानुसार महिला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारातील विजेत्या खेळाडूंना पदक दिल्यानंतर दक्षिण कोरिया आणि भारत या दोन देशांचे ध्वज फडकावण्यात आले, त्याचबरोबर दक्षिण कोरियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले.

Manu Bhaker
Ramita Jindal Paris Olympic 2024 : 'गोल्ड मेडल'पासुन रमिता जिंदल एक पाऊल दूर! १० मीटर एअर रायफल स्पर्धेत फायनलमध्ये मारली एन्ट्री

दरम्यान, सध्या मनू भाकरला पदक मिळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भारतभरातून तिचं कौतुक होत आहे. अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी तिला तिच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करत मनू भाकरचे कौतुक केले आहे.

त्याने लिहिले की 'पदकांचं खातं उघडलं आणि तेही नेमबाजीने. मनू भाकर भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकण्यासाठी तुझे अभिनंदन. टोकियोमधील हार्टब्रेकनंतरही तू पॅरिसमध्ये पदक जिंकताना ताकद आणि समर्पण दाखवलंस. तू भारताला गौरवान्वित केले आहेस.'

Manu Bhaker
Paris Olympic 2024: भारतीय नारी सब पर भारी! मनू भाकरने ब्राँझ मेडल जिंकत रचला इतिहास

टोकियो ऑलिम्पिकमध्येही मनूच्या पिस्तुलममध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तिचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. मात्र त्यानंतर तिने दमदार पुनरागमन करत पॅरिसमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा कारनामा केला आहे.

पहिलीच महिला भारतीय महिला नेमबाज

मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिलीच नेमबाज ठरली. तिच्यापूर्वी राज्यवर्धन सिंग राठोड (२००४), अभिनव बिंद्रा (२००८), विजय कुमार (२०१२) आणि गगन नारंग (२०१२) या भारतीय पुरुष नेमबाजांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे.

Pratima olkha:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.