Vinesh Phogat: 'पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्यास मी नकार दिला कारण...', विनेशचा खळबळजनक दावा

Vinesh Phogat claims she refused to talk with PM Modi: विनेश फोगाटने नुकताच दावा केला आहे की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर तिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बोलण्यास नकार दिला होता. यामागील कारणही तिने स्पष्ट केले आहे.
Vinesh Phogat | PM Narendra Modi
Vinesh Phogat | PM Narendra ModiSakal
Updated on

Vinesh Phogat News: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम सामन्यात पोहचली होती. परंतु, अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन नियमानुसार साधारण १०० ग्रॅम अधिक भरलं, यामुळे तिला ऑलिम्पिक समितीकडून अपात्र ठरवण्यात आलं.

या निर्णयाविरुद्ध तिने क्रीडा लवादाकडे दादही मागितली होती. परंतु तिची अपीलही फेटाळले. त्यामुळे तिचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्नही भंगले. दरम्यान आता तिने नुकताच दावा केला आहे की अपात्र ठरल्यानंतर तिने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बोलण्यास नकार दिला होता.

तिने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की तिला राजकीय उद्देशाने तिच्या भावनांचा आणि प्रयत्नांचा वापर व्हावा असं वाटत नसल्याने तिने त्यांच्याशी बोलण्यास नकार दिल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.

Vinesh Phogat | PM Narendra Modi
१४ लाख वार्षिक उत्पन्न, २ कोटींचे प्लॉट, अन्...! Vinesh Phogat ने प्रतिज्ञापत्रात जाहीर केली Property, वाचाल तर व्हाल हैराण

विनेश म्हणाली, 'मला कॉल आला होता, पण मी बोलण्यास नकार दिला. मला डायरेक्ट कॉल आला नव्हता, पण तिथे भारतीय अधिकारी होते, त्यांनी मला सांगितले की पंतप्रधान मोदी यांना माझ्याशी बोलायचे आहे. मी तयार होते, पण त्यांनी मग माझ्यासमोर एक अट ठेवली.'

'त्यांनी सांगितले की माझ्या टीममधील कोणीही तिथे उपस्थित नसेल, तर त्यांच्या बाजूचे दोन लोक तिथे असतील, जे सोशल मीडियासाठी संभाषण रेकॉर्ड करतील. मला माझ्या भावना आणि मेहनतीची मस्करी सोशल मीडियावर करून घ्यायची नव्हती.'

विनेश पुढे म्हणाली, जर खरंच मनापासून कॉल आला असता, तर तिला आनंद झाला असता. ती म्हणाली, 'जर त्यांना खरंच खेळाडूंची काळजी असती, तर त्यांनी रेकॉर्डिंगशिवाय देखील कॉल केला असता आणि मला तसं झालं असतं, तर आनंदच झाला असता.'

Vinesh Phogat | PM Narendra Modi
Vinesh Phogat: निकालाविरुद्ध विनेशला अपीलच करायचे नव्हते? वकील हरिश साळवेंचा खळबळजनक दावा

ती पुढे म्हणाली, 'कदाचीत त्यांना माहित असेल की जर ते माझ्याशी बोलले, तर मी त्यांना दोन वर्षांपूर्वीच्या गोष्टीबद्दल विचारेल. कदाचीत म्हणूनच मला सांगण्यात आलेलं की माझ्याबाजूने तिथे फोनही नसेल कारण नंतर मग ते माझं बोलणं एडिट करू शकतात. पण मी तसं एडिट करणार नाही. मी खरा व्हिडिओ पोस्ट केला असता. त्यामुळे त्यांनी मला नकार दिला असेल.'

विनेशने भारताच्या इतर काही कुस्तीपटूंसह गेल्यावर्षी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन केलं होतं. त्यांनी महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. हे प्रकरण अद्यापही न्यायालयात सुरू आहे.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधील अपात्रतेच्या प्रकरणादरम्यान विनेशने कुस्तीमधून निवृत्तीही घेतली. तसेच तिने काही दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला आहे. तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून तिला हरियाणातून काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी उमेदवारीही दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.