Vinesh Phogat News: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटची पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत अपात्र ठरवण्याविरुद्ध क्रीडा लवादाकडे दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे तिला पदकही मिळणार नाही हे स्पष्ट झाले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. तिने अंतिम फेरीत धडकही मारली होती. पण अंतिम सामन्याच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅमने अधिक भरलं.
त्यामुळे नियमानुसार ऑलिम्पिक समितीने तिला अपात्र ठरवत सर्वात शेवटच्या स्थानावर ठेवलं. या विरोधात तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. पण तिची याचिका फेटाळण्यात आली.
दरम्यान, अंतिम सामन्याच्या आदल्या रात्री काय झालं होतं, याबाबतची माहिती समोर येत आहे. विनेशने तिच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नियमानुसार तीन सामने जिंकत अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला होता. पण या तीन सामन्यानंतर तिचं वजन वाढलं होतं. याबाबत तिचे प्रशिक्षक वॉलर ऍकोस यांनी एक पोस्ट केली होती, जी नंतर त्यांनी डिलिट केली. त्यात त्यांनी असही लिहिलेलं की एका क्षणी त्यांनी ती जीव गमावेल असं वाटलं होतं.