Paris Olympic 2024: उधार घेतली, लेकीच्या स्वप्नांना दिलं बळ ! शेतकऱ्याची पोर ऑलिम्पिक गाजवण्यासाठी सज्ज

Archer Bhajan Kaur: भारताची १८ वर्षीय तिरंदाजपटू भजन कौर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे, तिच्या या यशात तिच्या वडिलांचा मोठा वाटा होता.
Indian Archer Bhajan Kaur
Indian Archer Bhajan KaurSakal
Updated on

India Archer Bhajan Kaur Story: ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा कुंभमेळा. साधारण १८-२० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील शेकडो खेळाडू सहभागी होतात. त्यांच एकच लक्ष्य असतं, ते म्हणजे मेडल जिंकणं. खरंतर कोणत्याही खेळाडूचं ऑलिम्पिकमध्ये सामील होणं आणि मेडल जिंकणं हे स्वप्न असतं.

मेडल जिंकणंच नाही, तर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठीही खेळाडूंना मोठी मेहनत घ्यावी लागते. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी आधी विविध स्पर्धांमध्ये कमाल दाखवावी लागते, तेव्हा कुठे ऑलिम्पिकमध्ये सहभागाची संधी मिळते.

दरम्यान, अनेकजण ही आव्हानं जिद्दीनं पार करतात. काही अनेकांसाठी आदर्शही ठरतात. अशीच गोष्ट आहे भारताच्या १८ वर्षीय तिरंदाजपटू भजन कौर हिची.

Indian Archer Bhajan Kaur
Paris Olympic 2024: एकटा वाघ जगाला भारी! ऑलिंपिकच्या इतिहासात भारताने जितके गोल्ड मेडल जिंकलेत त्याच्या डबल 'या' पठ्ठ्याकडे

यंदा २६ जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भजन कौर सहभागी होणार आहे. तिची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे.

तिने गेल्याच महिन्याच तुर्कीमधील अंताल्या येथे फायनल ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा जिंकला. ती तिरंदाजीमधील रिकर्व्ह प्रकारात एकेरीमध्ये सहभागी होणारी पहिलीय भारतीय महिला ठरली आहे. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता.

भजनच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे तिला संघर्ष करावा लागणारच होता. पण या सगळ्यात तिला भक्कम पाठिंबा तिच्या कुटुंबाने दिला. हरियाणामधील सिरसा येथ ती राहते. हरियाणामधील मुलं साधारण कुस्ती किंवा हॉकी असे खेळ खेळताना दिसतात. पण भजनने तिरंदाजी निवडली.

Indian Archer Bhajan Kaur
Paris Olympic 2024 : जिद्दीला सलाम! ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी पठ्ठ्याने स्वत:चं बोट कापलं, धक्कादायक कारण आले समोर

तिची शाळा तिरंदाजी करणाऱ्या १४ वर्षांखालील एका मुलीच्या शोधात होती. त्याचवेळी तिच्या शाळेतील शिक्षिकेने तिला यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. ती त्यावेळी १२ वर्षांची होती. त्यानंतर तिने रिकर्व्ह प्रकारात तिरंदाजीची ट्रेनिंग सुरू केली.

पण खेळ खेळायचा तर त्याची साधणंही हवीत तिच्या धन्युष्यबाणासाठी शेतकरी असलेल्या तिच्या वडिलांनी २५ हजार रुपये उधाराने घेतले आणि आपल्या लेकीच्या स्वप्नांना बळ दिलं. ते तिला रोज आर एस नेहरा यांच्याकडे ट्रेनिंगसाठी घेऊन जायचे. त्यांनी तिच्यासाठी शेतात तिच्या सरावासाठी आर्चरी रेंजही तयार कली.

तिने नंतर जमशेदपूरला टाटा आर्चरी ऍकेडमीमध्ये ट्रेनिंगला सुरुवात केली. तिथे तिने कोरियन प्रशिक्षक लीम छाए वूंग यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग केली.

Indian Archer Bhajan Kaur
कुणी एकटे तर कुणी पार्टनरसोबत गाजवणार 'सिटी ऑफ लव्ह'; Paris Olympics मध्ये भाग घेणारे टॉप लेस्बियन खेळाडू

भजनने खेलो इंडिया गेम्समध्ये चमकदार कामगिरी केली. तिने देशांतर्गत स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली. ती १६ वर्षांची असताना तिची निव़ड आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ साठी भारतीय तिरंदाजी संघात झाली. या संघाकडून ती कांस्य पदकही जिंकली.

तिने २०२२ मध्ये आशियाई ग्रँड प्रिक्स सर्कीटमध्येही सांघिक दोन सुवर्णपदके जिंकली, तर २०२४ मध्ये याच स्पर्धेत एक सांघिक आणि एक वैयक्तिक रौप्य पदक जिंकले. वर्ल्ड कप स्टेजमध्ये तिने २ सांघिक कांस्य पदक जिंकले आहे.

आता ती पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असून पदकासाठी लढताना दिसेल. तिची पहिली फेरी २५ जुलैला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजता चालू होणार आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.