Ashwini Ponnappa Retirement : "माझी शेवटची...", पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग तीन पराभवानंतर भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Ashwini Ponnappa Retirement News : मंगळवारी बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला दुहेरी संघात खेळणाऱ्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांना पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.
Ashwini Ponnappa Retirement
Ashwini Ponnappa Retirementsakal
Updated on

Ashwini Ponnappa Retirement : मंगळवारी बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला दुहेरी संघात खेळणाऱ्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांना पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

अश्विनी आणि तनिषाला क गटातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सेटियाना मापासा आणि अँजेला यू यांच्याकडून 15-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा हिने निवृत्ती जाहीर केली. हे तिचे शेवटचे ऑलिम्पिक असल्याचे तिने सांगितले.

Ashwini Ponnappa Retirement
Suryakumar Yadav : 'मला कर्णधार व्हायचं नाही तर...' टी-20 मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने केलं मोठं वक्तव्य

अश्विनीने 2001 मध्ये तिचे पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले आणि ज्वाला गुट्टासह एक मजबूत आणि इतिहास घडवणारी महिला जोडी तयार केली. ज्वाला गुट्टा 2017 पर्यंत खेळली. तिने 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि उबेर कप (2014 आणि 2016) आणि आशियाई चॅम्पियनशिप (2014) मध्ये कांस्य पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती.

अश्विनी आणि ज्वाला या दोन ऑलिम्पिकमध्ये (2012 आणि 2016) एकत्र खेळल्या पण प्राथमिक टप्प्याच्या पुढे त्यांना प्रगती करता आली नाही. अश्विनी म्हणाली, “आम्हाला आज जिंकायचे होते. आम्हाला निकाल चांगला हवा होता, माझ्यासाठी आणि तनिषासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला खूप लांबचा प्रवास करावा लागला. ते सोपे नव्हते.''

Ashwini Ponnappa Retirement
SL vs IND : टी-20 मालिका संपली, आता रंगणार ODIचा थरार! जाणून घ्या वेळापत्रक अन् सर्वकाही...

34 वर्षीय अश्विनी तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळत असताना तिला 2028 च्या लॉस एंजेलिस गेम्समध्ये खेळायचे आहे का असे विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “हे माझे शेवटचे ऑलिम्पिक असेल, पण तनिषाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ती अश्रू रोखण्याचा प्रयत्न करीत म्हणाली. हे सोपे नाही, जर तुम्ही थोडे तरुण असाल तर तुम्ही हे सर्व हाताळू शकता. इतका वेळ खेळल्यानंतर मी आता ते घेऊ शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.